27.9 C
Mumbai
Tuesday, July 15, 2025
घरक्राईमनामाब्रिटनमध्ये सात पाकिस्तानी दोषी; दोन मुलींचे लैंगिक शोषण

ब्रिटनमध्ये सात पाकिस्तानी दोषी; दोन मुलींचे लैंगिक शोषण

इंग्लंडमधील ग्रूमिंग गँग' प्रकरण

Google News Follow

Related

इंग्लंडच्या उत्तरेकडील दोन असुरक्षित मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या सात पाकिस्तानी पुरुषांना दोषी ठरवण्यात आले आहे, अशी माहिती ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी दिली. हे प्रकरण इंग्लंडमध्ये दशकांपासून सुरू असलेल्या ‘ग्रूमिंग गँग’ घोटाळ्याचा एक भाग आहे.

या सात आरोपींवर बलात्कार, बाल लैंगिक अश्लीलता यासह एकूण ५० गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले, जे २००१ ते २००६ दरम्यान घडले.

हे ही वाचा:

ब्लॅक बॉक्स डेटा डीकोड केला जातोय!

गोवंडीत डंपरच्या धडकेत एकाच कुटूंबातील चौघे ठार

“विश्वासाधारित शासना”मुळे अर्थव्यवस्था शिखर गाठू शकते

पुतीन यांची इच्छा, ट्रम्प यांची करणी भारत-चीन यांची हातमिळवणी

मँचेस्टर मिन्शूल स्ट्रीट क्राउन कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात प्रोसीक्यूटर रोस्सानो स्कमार्डेला यांनी न्यायालयाला सांगितले की, या दोन मुली लैंगिक संबंधासाठी एकमेकांकडे पाठवल्या गेल्या, त्यांचे शोषण, अपमान करण्यात आला आणि नंतर त्यांना फेकून दिलं गेलं.”

स्कमार्डेला यांनी स्पष्ट केले की, या दोन मुली समाजकल्याण विभागाच्या रडारवर होत्या. या मुलींना दक्षिण आशियातल्या पुरुषांसोबत संबंध ठेवावे लागते होते, हे पुरते स्पष्ट होते.

  • ही परिस्थिती इतर ग्रूमिंग गँग प्रकरणांसारखीच होती.
  • आरोपींनी सर्व आरोप नाकारले, पण तीन आठवड्यांच्या विचारविनिमयानंतर न्यायालयाने सर्वांना दोषी ठरवले.

राजकीय गोंधळ आणि एलन मस्कचा आरोप

या मुद्द्याने यंदा ब्रिटनमध्ये राजकीय चर्चेचे केंद्र गाठले, कारण एलन मस्कने पंतप्रधान किअर स्टार्मर यांच्यावर टीका केली होती.

मस्कने आरोप केला की स्टार्मर जेव्हा ब्रिटनचे मुख्य सरकारी वकील (Chief Prosecutor) होते, तेव्हा त्यांनी या घोटाळ्यावर कारवाई केली नाही. यावर स्टार्मर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत हे आरोप फेटाळून लावले.

२०१४ च्या चौकशी अहवालात असे निष्कर्ष नोंदवले गेले की:

  • १९९७ ते २०१३ दरम्यान रॉदरहॅममध्ये किमान १४०० मुली लैंगिक शोषणाची बळी ठरल्या.
  • अधिकांश आरोपी पाकिस्तानी वंशाचे होते.
  • जातीय तणाव टाळण्यासाठी किंवा ‘वांशिक द्वेषभावनेचा आरोप होईल’ या भीतीने स्थानिक अधिकाऱ्यांनी या गुन्ह्यांकडे डोळेझाक केली.

ब्रिटनमधील अनेक शहरांमध्ये अशाच ‘ग्रूमिंग गँग’ प्रकरणांमुळे गुन्हेगारी खटले आणि स्थानिक चौकशी सुरू झाल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा