27.3 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरविशेषराजस्थानात होणार संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक

राजस्थानात होणार संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक

जोधपूरमध्ये 5 ते 7 सप्टेंबरदरम्यान होणार आयोजन

Google News Follow

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा 5 ते 7 सप्टेंबर या कालावधीत राजस्थानमधील जोधपूर येथे आयोजित केली जाणार आहे. संघ व संघाशी संबंधित वैचारिक संस्थांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक दरवर्षी आयोजित केली जाते. मागील वर्षी ही बैठक केरळमधील पालक्काड येथे झाली होती.

या बैठकीत भाजप, विश्व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ, राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, विद्या भारती यांसह संघ प्रेरित 32 संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, संघटनमंत्री व प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, तसेच सर्व सह सरकार्यवाह व अन्य वरिष्ठ पदाधिकारी यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.

संघाच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत सहभागी संघटना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनुभवांच्या आधारे विविध घडामोडींचे मूल्यांकन सादर करतात. या बैठकीत ट्रम्प टॅरिफसह जागतिक आर्थिक परिस्थितींचा भारतावर होणारा परिणाम

भारताच्या सीमांची सध्याची स्थिती‘ऑपरेशन सिंदूर’ व त्याचे राष्ट्रीय स्तरावरील प्रभाव

स्वावलंबन अभियान व त्यातील पुढील टप्पे, वेगाने बदलणारी धार्मिक लोकसंख्येची स्थिती

कुटुंब प्रबोधन याची गरज,संघ शताब्दी वर्षासाठी ठरवलेले ‘पंच परिवर्तन’ आणि शताब्दी वर्षानिमित्त समाज परिवर्तनाचे उद्दिष्ट या विषयावर चर्चेची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा