30 C
Mumbai
Friday, June 21, 2024
घरविशेषदहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले अमृतपाल, शेख रशीद निवडून आलेत, पुढे काय?

दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले अमृतपाल, शेख रशीद निवडून आलेत, पुढे काय?

इंजिनीअर रशीद, अमृतपाल सिंग यांना दोषी ठरवले गेल्यास खासदारकी गमवावी लागेल

Google News Follow

Related

सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले दोन उमेदवार निवडून आले आहेत. अमृतपाल सिंग पंजाबच्या खदूर साहिबमधून लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत, तर शेख अब्दुल रशीद काश्मीर खोऱ्यातील बारामुल्लामधून निवडून आले आहेत. सध्या तुरुंगात असलेल्या दोन उमेदवारांच्या निवडणुकीने एक वेगळाच प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांना खासदारकीची शपथ घेता येईल का आणि ते संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहू शकतील का?

कायदेशीररित्या, अमृतपाल सिंग आणि शेख अब्दुल रशीद यांना १८व्या लोकसभेच्या कामकाजात उपस्थित राहण्यास मनाई आहे, तरीही त्यांना संसद सदस्य म्हणून शपथ घेण्याचा घटनात्मक अधिकार कायम आहे, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. ४ जून रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालांनुसार, तुरुंगात असलेले शीख धर्मोपदेशक अमृतपाल सिंग यांनी खडूर साहिब मतदारसंघात विजय मिळवला, तर शेख अब्दुल रशीद, ज्यांना इंजिनीअर रशीद म्हणून ओळखले जाते, ते काश्मीरमधील बारामुल्लामध्ये विजयी झाले.

दहशतवादाला आर्थिक साह्य केल्याच्या आरोपाखाली इंजिनीअर रशीद ९ ऑगस्ट २०१९पासून तिहार तुरुंगात आहेत. सिंग यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले असून ते आसाममधील दिब्रुगड तुरुंगात आहेत. घटनातज्ज्ञ आणि लोकसभेचे माजी सरचिटणीस पीडीटी आचारी यांनी या प्रकरणाची कायदेशीर बाजू स्पष्ट केली. निवडणूक जिंकल्यानंतर शपथ घेणे हा घटनात्मक अधिकार असल्याचे ते म्हणाले. परंतु जर विजयी उमेदवार तुरुंगात असेल तर त्यांनी अधिकाऱ्यांना शपथविधीसाठी संसदेत नेण्यास सांगितले पाहिजे. परंतु त्यांनी शपथ घेतल्यावर त्यांना तुरुंगात परतावे लागेल.

त्यांनी पुढील तरतुदी स्पष्ट केल्या. त्यांनी घटनेच्या कलम १०१ (४)चा उल्लेख केला. ज्यात दोन्ही सभागृहांतील खासदारांच्या अनुपस्थितीबाबत अध्यक्षांना माहीत नसल्यास असणाऱ्या तरतुदींचा उल्लेख आहे. सर्व खासदारांच्या शपथविधीनंतर अनुपस्थित असलेल्या खासदारांबाबत सभापतींना कळवले जाईल. त्यानंतर सभापती खासदारांच्या सभागृहात उपस्थित राहण्याबाबतच्या असमर्थतेबद्दल , सदस्यांच्या अनुपस्थितीबद्दल सभागृह समितीला कळवतील. खासदारांना सभागृहाच्या कामकाजात उपस्थित राहू द्यायचे की नाही, अशी शिफारस समिती करते. नंतर ही शिफारस पुढे नेली जाते आणि सभापतींद्वारे सभागृहाचे मत जाणून घेण्यासाठी ते खासदारांसमोर मांडले जाते.

हे ही वाचा:

दिल्लीकरांची तहान भागणार; हरियाणा, हिमाचलमधून मिळणार अतिरिक्त पाणी

विरोधकांना आता पाच वर्षं देव पाण्यात घालूनच बसायचं आहे!

नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांचा आयटीबीपी पोलिस कॅम्पवर हल्ला, जीवितहानी नाही!

एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार

अमृतपाल सिंग, इंजिनीअर रशीद दोषी ठरल्यास त्यांच्या जागा गमावतील?

इंजिनीअर रशीद किंवा सिंग हे दोषी ठरून त्यांना दोन वर्षांचा तुरुंगवास झाल्यास ते लोकसभेतील त्यांची जागा गमावतील. सन २०१३च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अशा खासदार आणि आमदारांना अपात्र ठरवले जाईल. त्यानंतर समिती सदस्याला सभागृहाच्या कामकाजात अनुपस्थित राहण्याची परवानगी द्यावी की नाही, यासाठी मत मागितले जाईल. याबाबतचा प्रस्ताव सभापतींद्वारे सभागृहासमोर मांडला जाईल. इंजिनीअर रशीद किंवा सिंग यांना दोषी ठरवले गेले आणि त्यांना किमान दोन वर्षांचा तुरुंगवास झाला, तर त्यांना लोकसभेतील त्यांची जागा ताबडतोब गमवावी लागेल. सन २०१३च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अशा प्रकरणांमध्ये खासदार आणि आमदारांना अपात्र ठरवले जाईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा