35 C
Mumbai
Monday, April 29, 2024
घरविशेषसमाजसेवक आणि साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन

समाजसेवक आणि साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन

Google News Follow

Related

ज्येष्ठ समाजसेवक आणि साहित्यिक अनिल अवचट यांचे आज २७ जानेवारी रोजी निधन झाले. अनिल अवचट यांनी ७८ व्या वर्षी पुण्याच्या राहत्या घरी सकाळी ९.१५ च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली.

१९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केले होते. आतापर्यंत त्यांची ३८हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी लिखाण करून ते प्रश्न प्रकाशझोतात आणले आहेत.

अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची नवी अनोखी पद्धत शोधली. आज ही अनोखी पद्धती जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. पारोमिता गोस्वामी, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक श्री. नागराज मंजुळे, गिरीश लाड, आबा महाजन, प्रमोद उदार यांच्या सारख्या मान्यवरांना हा पुरस्कार मिळाला आहे.

अनिल अवचट हे एक उत्कृष्ट पत्रकार होते. मात्र, त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला. अनिल अवचट यांनी त्यांची पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली.

हे ही वाचा:

प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी यांचा पद्मश्री स्वीकारण्यास नकार

आता कारने उडत उडत प्रवास करता येणार!

राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे

भारतीय महिला हॉकी संघाला उघडले वर्ल्डकपचे दरवाजे

व्यसनमुक्ती क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते २०१३ मध्ये अनिल अवचट यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना २०१८ मध्ये मिळाला होता. महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार, २०११ सालचा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, २०१७ सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार सारखे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने ‘सर्वोत्कृष्ट पुस्तके’ म्हणून जाहीर केली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा