33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरविशेषअभय देओल म्हणाला, अनुराग कश्यप खोटारडा आणि विषारी

अभय देओल म्हणाला, अनुराग कश्यप खोटारडा आणि विषारी

अनुराग कश्यपने केलेल्या दाव्यांचा अभयने घेतला समाचार

Google News Follow

Related

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप हा खोटारडा आणि विषारी व्यक्ती आहे, असे वक्तव्य अभिनेता अभय देओल याने केल्यामुळे बॉलीवूडमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. २००९मध्ये या दोघांनी देव डी ही फिल्म केली होती. पण अभय देओलने आपल्या मनातील ही भावना बोलून दाखवत कश्यपचे खरा चेहरा उघड केला आहे.

ट्रायल बाय फायर या आपल्या वेबसीरिजचे प्रमोशन करत असलेला अभय देओल एका मुलाखतीत म्हणाला की, अनुराग कश्यपने माझ्याविषयी मीडियात खोटेनाटे सांगितले. त्यातील एक म्हणजे देव डी चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेला मी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे त्याने सांगितले. उलट कश्यपनेच मला सांगितले होते की, फिल्मच्या यूनिटसोबत तू राहू नकोस कारण तू देओल खानदानातला आहेस.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे बाद, आता राहुल पंतप्रधान!

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेची भेट

कुस्ती महासंघाची चहुबाजूंनी नाकाबंदी; सर्व कार्यक्रमांवर बंदी, अतिरिक्त सचिवांना हटवले

श्याम मानव नावाचा भोंदू बाबा

अभय देओल म्हणाला की, अनुरागने अनेक खोट्या गोष्टी माझ्याबद्दल सार्वजनिक केलेल्या आहेत. मी देओल असल्यामुळे मला हॉटेलमध्ये राहायला हवे असे त्याने म्हटले होते.

अनुराग कश्यपने २०२०मध्ये मुलाखतीत म्हटले होते की, अभय देओल याला कलात्मक चित्रपट करायचे आहेत पण त्याला मुख्य धारेतील चित्रपटक्षेत्राच्या सगळ्या सुविधाही हव्या आहेत. मुख्य म्हणजे ‘देओल’ असण्याचे सगळे फायदे त्याला हवे आहेत. देव डी हा चित्रपट कमी बजेटचा असला तरी त्या चित्रपटाच्या वेळेला त्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायचे होते. अशा वागणुकीमुळेच त्याच्याकडे अनेक दिग्दर्शक येत नाहीत.

अभय देओलने या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगितले की, मला अशा विषारी लोकांची अजिबात गरज नाही. मी त्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. मी इतरांनाही त्याच्यापासून सावध राहण्याच्या सूचना केल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा