24 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरविशेषसचिन तेंडुलकरचे १०० शतकांव्यतिरिक्त हे रेकॉर्ड मोडणे अशक्य

सचिन तेंडुलकरचे १०० शतकांव्यतिरिक्त हे रेकॉर्ड मोडणे अशक्य

Google News Follow

Related

सचिन तेंडुलकरने ५१वा वाढदिवस साजरा केला. भारतीय क्रिकेट संघाच्या माजी दिग्गज फलंदाजाने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकाचे शतक ठोकणे म्हणजेच १०० शतके ठोकणे हा त्याचा सर्वात मोठा विक्रम आहे. पण १०० शतकांव्यतिरिक्त सचिन तेंडुलकरचे असे पाच विक्रम आहेत, जे मोडणे जवळपास अशक्य मानले जाते.

१. सर्वाधिक कसोटी सामने
सचिन तेंडुलकर हा सर्वाधिक २०० कसोटी सामने खेळणारा फलंदाज आहे. सध्या कसोटी क्रिकेट फारसे खेळले जात नाही. अशा परिस्थितीत खेळाडूने केवळ १०० कसोटी खेळल्या तर ती मोठी उपलब्धी मानली जाते. मात्र, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आतापर्यंत १८७ कसोटी सामने खेळले आहेत. आता तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

२. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा
सचिन तेंडुलकरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३४,३५७ धावा चोपून काढल्या आहेत. तो क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू आहे. सचिनचा हा विक्रम मोडणे जवळपास अशक्य आहे. सध्या विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे ज्याने २५,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडला आहे.

३. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वाधिक सामने
सचिन तेंडुलकर हा आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक सामने खेळणारा फलंदाज आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. सध्या ५०० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा टप्पा पार करणारा विराट कोहली एकमेव फलंदाज आहे.

हेही वाचा :

हार्दिक पंड्याच्या मदतीला सेहवाग आला धावून 

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही

‘निवडणुकीचे वार्तांकन करण्याची परवानगी न दिल्याचा ऑस्ट्रेलियन पत्रकाराचा आरोप दिशाभूल करणारा’

जिजाजी येत आहेत, जमिनीची कागदपत्रे लपवा

४. सर्वाधिक चौकार
सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज आहे. तेंडुलकरने ६६४ सामन्यांच्या ७८२ डावांमध्ये फलंदाजी करताना ४०७६ चौकार मारले आहेत. या यादीत दुसरे नाव कुमार संगकाराचे आहे. ज्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३०१५ चौकार लगावले.

५. ५० किंवा त्याहून अधिक स्कोअर
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. तेंडुलकरने २६४ वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला. ज्यात १०० शतके आणि १६४ अर्धशतकांचा समावेश आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा