31 C
Mumbai
Saturday, May 25, 2024
घरविशेष‘निवडणुकीचे वार्तांकन करण्याची परवानगी न दिल्याचा ऑस्ट्रेलियन पत्रकाराचा आरोप दिशाभूल करणारा’

‘निवडणुकीचे वार्तांकन करण्याची परवानगी न दिल्याचा ऑस्ट्रेलियन पत्रकाराचा आरोप दिशाभूल करणारा’

अवनी डायसने तिचे व्हिसाचे तपशील खोटे दिल्याचा इंडिया टुडेच्या पत्रकाराचा दावा

Google News Follow

Related

एबीसी न्यूजच्या दक्षिण आशिया विभागाच्या प्रमुख ऑस्ट्रेलियन पत्रकार अवनी डायस यांनी भारत सरकारच्या विरोधात प्रचार करून केल्या जात असलेल्या उघड खोटेपणाचा ‘इंडिया टुडे’च्या पत्रकार गीता मोहन यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून निषेध केला. आदल्या दिवशी, भारतविरोधी पत्रकार अवनी डायस यांनी मोदी सरकारने त्यांच्या व्हिसाला मुदतवाढ न दिल्याने त्यांना ताबडतोब भारत सोडावा लागला, असा आरोप केला होता.

गीता मोहन यांनी एका स्त्रोताचा हवाला देत ‘ऑस्ट्रेलियन पत्रकाराचा तिला देश सोडण्यास भाग पाडले गेले आणि निवडणुकीचे वार्तांकन करण्याची परवानगी दिली नाही, हा दावा चुकीचा, दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे. डायसने व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. तसेच, असे असूनही, लोकसभा निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी तिच्या विनंतीनुसार तिचा व्हिसा वाढविला जाईल, असे तिला कळविण्यात आले होते.

डायसच्या व्हिसाची मुदत २० एप्रिल २०२४पर्यंत होती. नंतर ती जून अखेरपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर १८ एप्रिल रोजी डायसने व्हिसा शुल्क भरले होते, म्हणजेच १८ एप्रिल २०२४ रोजी व्हिसाची मुदतवाढ देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. डायसने २० एप्रिल रोजी भारत सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी तिचा व्हिसा वैध होता आणि मुदतवाढीची तिची विनंती मंजूर झाली होती, असा दावा गीता मोहन यांनी केला.

हे ही वाचा:

‘बेकायदा स्थलांतरितांना रवांडामध्ये पाठविण्याच्या मार्गात आता कसलेही अडथळे नाहीत’

मुंबईत सूर्य आग ओकणार; आठवड्याअंती उकाडा वाढणार

पतंजलीकडून पूर्वीच्या माफीनाम्यापेक्षा अधिक ठळक, आकाराने मोठा माफीनामा जारी

‘हा तर देश तोडण्याचा कट’

डायसला निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात आली नाही, हे डायसचे म्हणणे असत्य असल्याचा दावा गीता यांनी केला. सर्व व्हिसाधारक पत्रकारांना मतदान केंद्राबाहेरील निवडणूक कामकाजाच्या वार्तांकनाची परवानगी आहे. केवळ मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्रांवर प्रवेश करण्यासाठी प्राधिकरणाची पत्रे आवश्यक आहेत. तथापि, व्हिसाची मुदतवाढीची प्रक्रिया सुरू असताना ही प्रक्रिया करता येत नाहीत. मेघना बाली आणि सोम पाटीदार यांना त्यांची पत्रे आधीच कशी मिळाली आहेत, याकडे गीता यांनी लक्ष वेधले.

२३ एप्रिल रोजी, ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कंपनी (एबीसी) न्यूजच्या दक्षिण आशिया ब्युरो चीफ, अवनी डायस यांनी दावा केला की मोदी सरकारने त्यांच्या व्हिसाच्या मुदतवाढीस नकार दिल्याने त्यांना अचानक भारत सोडावा लागला. तसेच, २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तिला वार्तांकन न करू देण्याचा भारत सरकारचा कट आहे. डायसने दावा केला की, शेवटच्या क्षणी तिचा व्हिसा दोन महिन्यांसाठी वाढविण्यात आला, त्यानंतर ती ऑस्ट्रेलियाला परत गेली.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या एक दिवस आधी आपल्या मायदेशी परतल्याबद्दल तिने शोक व्यक्त केला.

त्यानंतर, एबीसी न्यूजने एक वादग्रस्त लेख प्रकाशित करून असा दावा केला की, डायसला परराष्ट्र मंत्रालयाकडून एक फोन कॉल आला आणि तिच्या व्हिसाची मुदत वाढवता येत नसल्याचे सूचित केले. ‘पत्रकाराने तिच्या प्रचाराने भरलेल्या युट्युब व्हिडीओ प्रसारित करून मर्यादा ओलांडली आहे. कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग होता, असा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे,’ असे या लेखात म्हटले आहे. मोदी सरकारने यूट्यूबला एबीसी न्यूज आणि दक्षिण आशिया ब्युरो चीफ अवनी डायस यांचा भारतविरोधी प्रचार व्हिडिओ रोखण्याचे निर्देश दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा