30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेष'यास' वादळाचा मुकाबला करायला भारतीय जवान सज्ज

‘यास’ वादळाचा मुकाबला करायला भारतीय जवान सज्ज

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमध्ये येऊ घातलेल्या अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय जवान सज्ज झाले आहेत. बुधवार, २६ मे रोजी पश्चिम बंगालला यास हे चक्रीवादळ धडकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या चक्रीवादळात मदत आणि बचावकार्य करण्यासाठी भारतीय सैन्याच्या ईस्टर्न कमांडच्या सैनिक तुकड्या कार्यरत असणार आहेत.

भारताच्या पश्चिम किनारपट्टीला नुकताच ‘तौक्ते’ वादळाचा फटका बसलेला. त्यात अनेक राज्यांमध्ये किनारपट्टी लगतच्या भागात नुकसान झाले. त्यातच आता भारताच्या पूर्व किनारपट्टीला ‘यास’ या चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे. बुधवार, २६ मे रोजी पश्चिम बंगालमध्ये या वादळाचा लँडफॉल होणार आहे. या वादळामुळे होणाऱ्या नुकसानीचा सामना करण्यासाठी भारतीय सेना सज्ज झाली असून केंद्र सरकारकडून सैनिकांच्या तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

मालदिवच्या अड्डू शहरात भारताचे नवीन वाणिज्य दूतावास

नालेसफाईचा दावा फोल, टक्केवारीच्या कारभाराचे भाजपाकडून पोस्टमार्टम

सप्टेंबरमध्ये परतणार आयपीएलचे धुमशान

सुशील कुमारचे नोकरीतून निलंबन

बचाव आणि मदत कार्यासाठी पारंगत असल्या सैनिकांच्या १७ तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. या साऱ्या तुकड्या बचावकार्यासाठी आवश्यक त्या सर्व सामग्रीने सज्ज असतील. बंगालमधील पुरुलिया, झारग्राम, बिरभुम, बर्धमान, पश्चिम मिदनापूर, हावडा, हुगळी, नाडिया, उत्तर आणि दक्षिण २४ परगणा येथे या सैन्य तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. तर नऊ तुकड्या या कलकत्ता येथे राखीव ठेवण्यात आल्या असून गरज पडेल त्या ठिकाणी तातडीने या तुकड्या पाठवण्यात येणार आहेत.

या तुकड्या वादळाच्या कचाट्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवणे, वैद्यकीय सहाय्य करणे, रस्ते मोकळे करणे, वादळामुळे पडलेली झाडे हटवणे, लोकांना मदतीची आवश्यक सामग्री वितरित करणे आणि स्थानिक प्रशासनाला आवश्यक असलेली सर्व मदत पुरवणे या प्रकारचे काम करतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा