31 C
Mumbai
Tuesday, September 26, 2023
घरविशेषआशिया चषकातील उर्वरित सामने कोलंबोहुन हंबनटोटा येथे हलवणार नाही !

आशिया चषकातील उर्वरित सामने कोलंबोहुन हंबनटोटा येथे हलवणार नाही !

आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) सामन्यांच्या स्थलांतराचा निर्णय बदलला

Google News Follow

Related

श्रीलंकेतील पावसामुळे कोलंबोत होणारी सुपर फोर फेरी आणि अंतिम लढत असे एकंदर सहा सामने कोलंबोहुन हंबनटोटा येथे हलवले जाणार असल्याचे वुत्त अलीकडेच आले होते.मात्र, आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आशिया चषक 2023 च्या वेळापत्रकात सध्या कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवार पासून सुपर फोरला सुरुवात होणार असून पहिला सामना लाहोरमध्ये पार पडणार आहे.त्याचबरोबर सुपर फोरचा अंतिम सामना आणि इतर पाच सामने कोलंबोमध्ये होणार असल्याचे एसीसी कडून सांगण्यात आले आहे.क्रिकबझच्या वृत्तानुसार, कोलंबोमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे आयोजक सुपर फोर फेरी सामना आयोजित करण्यासाठी नियोजन करत असल्याचे सांगितले आहे. कोलंबोमध्ये सध्या पूरस्थिती असल्याने आशिया चषकाचे उर्वरित सामने हंबनटोटा येथे होऊ शकतात असे बोलले जात होते.

हे ही वाचा:

सौरव गांगुलीच्या चरित्रपटामध्ये रणबीरऐवजी आयुष्मान?

नेपाळला पराभूत करत भारताची सुपर ४ मध्ये धडक

सेहवाग म्हणतो, जर्सीवर ‘इंडिया’ नव्हे ‘भारत’ नाव असावं

मणिपूरमध्ये संघर्ष भडकावल्याबद्दल ‘एडिटर्स गिल्ड’च्या चौघांविरोधात गुन्हा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCC) सचिव तसेच एसीसी प्रमुख जय शाह यांनी पीसीबीला उत्तर दिले आहे. ते म्हणाले, सामने स्थलांतरित केले जाणार नाहीत.पीसीबीचे वर्तमान चेअरमन झका अश्रफ यांनी हवामानाच्या परस्थितीमुळे आशिया कप २०२३ चे उर्वरित सामने श्रीलंकेतून पाकिस्तानमध्ये हलवण्याची शिफारस केली असल्याचे त्यांनी सांगितले.
आता १० सप्टेंबरला सुपर-४ मध्ये भारताचा पुन्हा सामना पाकिस्तानशी होणार आहे.या सामन्यासाठी ‘राखीव दिवस’ ठेवण्याचाही प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताचे सुपर-४ चे इतर सामने १२ आणि १५ सप्टेंबर रोजी होणार आहेत.
विशेष म्हणजे, हंबनटोटा हा प्रदेश अलीकडच्या आठवड्यात दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे गेला असून हा एक
शुष्क प्रदेश आहे.हंबनटोटा येथील राजपक्षे स्टेडियम आशिया चषक स्पर्धेचा भाग नव्हता.तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचे यजमानपद भूषवले होते तेव्हा ऑगस्टमध्ये येथे शेवटची वनडे खेळली गेली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,034अनुयायीअनुकरण करा
101,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा