31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरविशेषअविनाश साबळेची सोनेरी धाव!

अविनाश साबळेची सोनेरी धाव!

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अविनाश साबळे भारतातील पहिला खेळाडू

Google News Follow

Related

चीन मधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहेत.अनेक खेळाडू स्वतःचा विक्रम मोडत नवीन विक्रम रचत आहेत.अजून एक भर पडली आहे ती म्हणजे भारताचा आणि महाराष्ट्राचा लांब पल्ल्याचा धावपटू अविनाश साबळे याची. त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत ३ हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.सध्याच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे.विशेष म्हणजे एथलेटिक्स स्पर्धांमधलं भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे.

अविनाश ८ मिनिटे १९:५३ सेकंद वेळेसह पहिला राहिला. इराणच्या हुसेन केहानीचा ८ मिनिटे २२:७९ सेकंद हा त्याचा विक्रम अविनाश साबळेने मोडीस काढला.जपानच्या र्योमा आओकी आणि सेया सुनादा यांना अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी पाहता सातव्या दिवसाअखेर भारताची पदक संख्या ४४ पर्यंत पोहचली असून भारत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. चीन अव्वल स्थानावर आहे. जपान दुसऱ्या तर रिपब्लिक ऑफ कोरिया तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

हे ही वाचा:

गोल्फपटू अदिती अशोकने रचला इतिहास!

मणिपूर हिंसाचाराच्या कटात सहभागी असलेल्या व्यक्तीला एनआयएकडून अटक

ईदच्या जुलूसमधील टवाळखोरांकडून महिला पोलीस कॉन्स्टेबलची छेड, विक्रोळीत तणाव

भारत अमेरिका संबंध चांद्रयानाप्रमाणे झेपावतील!

असे करणारा पहिला भारतीय
अविनाश पहिली ते पाचवीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकला घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं त्याचे आई-वडील वीटभट्टीवर काम करायचे आणि त्यातही त्यांना तो मदत करायचा. शाळेत जाताना आणि येताना तो धावण्याचा सराव करायचा. त्याच्या याच सर्वामुळे २००५ मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांना पहिला नंबर पटकावला होता. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अविनाशला ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नसला तरी, स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता.

गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या अविनाशने ८.१९.५३ अशी वेळ नोंदवत पहिले स्थान पटकावले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेतही हा विक्रम आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे १२वे सुवर्णपदक होते. आशियाई क्रीडा स्पर्धेतील या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अविनाश हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. एवढेच नाही तर अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.१९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या १२ सुवर्ण, १६ रौप्य आणि १६ कांस्य अशी ४४ पदकांवर पोहोचली आहे.

पदकतालिकेबद्दल बोलायचे झाले तर सध्या चीनचे वर्चस्व दिसून येत आहे. चीनने १२१ सुवर्णांसह २२९ पदके जिंकली आहेत. याच्या खेळाडूंनी ७१ रौप्य आणि ३७ कांस्यपदकेही जिंकली आहेत. दक्षिण कोरिया (१२१) आणि जपान (१०६) क्रमांक २ आणि ३ वर आहेत. भारत ४४ पदकांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताच्या पदकांमध्ये मोठी भर पडण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत वेगवेगळ्या खेळामध्ये सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करत पदक पक्के केले आहे. यंदा भारताच्या नावावर कमीतकमी १०० पदकांची नोंद होण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा