आसाममध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मंगळवारी गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.पाच हजारहुन अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांना गुवाहाटी शहरात प्रवेश नाकारल्यावर त्यांनी गोंधळ घातला आणि पोलिसांचे बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला.यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला ज्यामध्ये अनेक काँग्रेस नेते जखमी झाले.विनापरवाना शहरात प्रवेश केल्याप्रकरणी आणि गोंधळ घातल्याप्रकरणी राहुल गांधींसह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला गुहावाटी शहरात प्रवेश नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी गदारोळ घातला.शहरात प्रवेश करण्यापूर्वीच काँग्रेस कार्यकर्त्यांना थांबवण्यात आले होते.त्यांना रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पोलिसांच्या केलेल्या लाठीचार्जमध्ये आसाम प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया हे जखमी झाले.
पोलिसांकडून शहरात प्रवेश बंदीसाठी बॅरिकेट्स लावण्यात आले होते.काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला,त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे.यापूर्वी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सरकारने गुहावाटीच्या मुख्य रस्त्यावरून यात्रा काढण्यास काँग्रेसला परवानगी दिली न्हवती.
हे ही वाचा:
कॅरम, घोडेस्वारी, बिलियर्ड्स, पॉवरलिफ्टिगं, शरीरसौष्ठवसाठी दरवाजे पुन्हा उघडले!
हमाससोबतच्या लढाई दरम्यान झालेल्या स्फोटात इस्रायलचे २१ सैनिक ठार
श्रीरामाच्या रॅलीवरील हल्ला प्रकरणी मिरारोडमध्ये कडेकोट बंदोबस्त, नितेश राणे भेट देणार
भव्य राम मंदिरात रोज होणार पूजा; पहाटे चार वाजता रामलल्ला उठणार
गुहावाटीच्या मुख्य रस्त्यावरून यात्रा निघाल्यास सर्वत्र ठिकाणी चक्काजाम होईल, यामुळे ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होईल आणि संपूर्ण शहर ठप्प होईल,असे प्रशासनाने सांगितले.
काँग्रेसने गुहावाटीच्या मुख्य मार्गाकडे जाण्याऐवजी आपला मोर्चा राष्ट्रीय मार्गाकडे वळवावा, असे सरकारकडून सांगण्यात आले होते.परंतु, राहुल गांधींच्या भारत जोडो न्याययात्रेने आपला मोर्चा गुहावाटीच्या मुख्य रस्त्याकडे वळवला. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राहुल गांधींसह अनेक कार्यकर्त्यांवर आसाम सरकारने गुन्हा दाखल केला आहे.