बांगलादेशात शोलोहाटी दुर्गा मंदिरावर कट्टरवाद्यांचा हल्ला, मूर्तींची केली तोडफोड!

प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही

बांगलादेशात शोलोहाटी दुर्गा मंदिरावर कट्टरवाद्यांचा हल्ला, मूर्तींची केली तोडफोड!

बांगलादेशात हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. कट्टरवाद्यांकडून अल्पसंख्यांक विशेषतः हिंदुना टार्गेट केले जात आहे. मारहाण, चोरी, मंदिरांची तोडफोड, अपहरण, हत्या अशा दररोज घटना घडत आहेत. पिडीत हिंदूंकडून सरकारकडे कारवाईची मागणी केली जात आहे. मात्र, युनुस सरकार कट्टरवाद्यांविरोधात कोणतीही कठोर कारवाई करत नाहीये. याच दरम्यान, बांगलादेशातील शोलोहाटी दुर्गा मंदिरावर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. अज्ञात हल्लेखोरांकडून मंदिरातील दुर्गा मूर्तींची तोडफोड करण्यात आली आहे.

बांगलादेशची राजधानी ढाकायेथील शोलोहाटी गावात ही घटना घडली. अज्ञात हल्लेखोर एका खाजगी गाडीतून पहाटे ३ च्या सुमारस गावात शिरले. हल्लेखोरांनी गावातील शोलोहाटी दुर्गा मंदिराचे कुलूप तोडून दुर्गा मूर्तीची तोडफोड केली आणि तेथून पळ काढला. या घटनेमुळे गावातील हिंदूंनी संताप व्यक्त केला आणि हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली. मात्र, नेहमी प्रमाणे स्थानिक पोलीस हातावर हात ठेवून यावेळीही बघ्याची भूमिका निभावली.

हे ही वाचा : 

राजस्थानच्या धोलपूरमध्ये तीन गो तस्करांना अटक, २६ गायींची सुटका!

मुस्लीम नर्स म्हणाली, ‘आम्ही अनेक इस्रायली रुग्णांना मारले, नरकात पाठवले’

“मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा निर्णय देण्यापूर्वी बदलीची टांगती तलवार डोक्यावर होती”

ममता कुलकर्णी यांचा यु- टर्न; किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावर कायम

मूर्तीच्या तोडफोडीचे व्हिडीओ, फोटो समोर आले आहेत, ज्यामधून कट्टरवाद्यांची मानसिकता दिसून येते. अशा घटना दररोज घडत असल्यामुळे तेथील हिंदू भयभीत झाला आहे. दोन दिवसांपूर्वी दिनाजपूर जिल्ह्यातून एक अपहरणाची घटना समोर आली होती. गावातील लबोनी रे नामक अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेला ९ दिवस उलटले होते. मात्र, स्थानिक पोलिसांनी कोणताही तपास केला नाही अथवा कारवाई केली नाही.

Exit mobile version