राजस्थानमधील धोलपूरमध्ये तीन गो तस्करांना अटक करण्यात आली आहे. बजरंग दलाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी कारवाई करत गो तस्करांच्या तावडीतून तब्बल २६ गायींची सुटका केली. पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.
गायींची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. एका कंटेनरमधून गायींना धोलपूरहून उत्तर प्रदेशला नेले जाणार असल्याचे कार्यकर्त्यांना समजले होते. यानंतर त्यांनी दोन-तीन दिवस रेकी केली आणि माहिती पक्की असल्याचे निश्चित केले.
हे ही वाचा :
मुस्लीम नर्स म्हणाली, ‘आम्ही अनेक इस्रायली रुग्णांना मारले, नरकात पाठवले’
“मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा निर्णय देण्यापूर्वी बदलीची टांगती तलवार डोक्यावर होती”
ममता कुलकर्णी यांचा यु- टर्न; किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावर कायम
आणखी अनधिकृत भारतीय अमेरिकेतून येणार
काल (१३ फेब्रुवारी) गायींना नेले जात असताना गोरक्षकांनी कंटेनरचा पाठलाग करत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी गो तस्करांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि वाहन घेवून पळ काढला. या गोळीबारात एक गोरक्षक जखमी झाला. जखमी गोरक्षकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
गो तस्करांनी वाहन घेवून पळ काढताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी माहितीच्या आधारे त्वरित नाकाबंदी लावत तीन गोतस्करांना अटक केली. पोलिसांनी गायींची तस्करी होत असलेला कंटेनर देखील जप्त केला. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई सुरु आहे.