हा खळबळजनक दावा करणाऱ्या नर्समध्ये एका पुरुषासह महिलेचा समावेश आहे. मोहम्मद रशद नादिर असे त्याचे नाव आहे तर साराह अबू असे महिला नर्सचे नाव आहे. मोहम्मद रशद नादिर या मुळचा अफगाणिस्तानचा आहे तर साराह अबू ऑस्ट्रेलियामध्ये शरणार्थी आहे, तिला चार वर्षांपूर्वीच देशाचे नागरिकत्व मिळाले होते.
हे ही वाचा :
“मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा निर्णय देण्यापूर्वी बदलीची टांगती तलवार डोक्यावर होती”
ममता कुलकर्णी यांचा यु- टर्न; किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावर कायम
आणखी अनधिकृत भारतीय अमेरिकेतून येणार
ट्रम्प म्हणाले, बांगलादेशाबाबत मोदींनी निर्णय घ्यावा, आमची काहीही भूमिका नाही!
या दोघांनी व्हिडिओ चॅटद्वारे एका इस्रायली व्यक्तीशी संवाद साधला. यावेळी संवाद साधताना दोघांनी दावा केला की, यहुदी धर्माला मानणारे आणि इस्रायली नागरिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले तर आम्ही त्यांना मारून टाकतो. यहुदी हे त्यांचे दुश्मन असल्याचे त्यांनी सांगितले आणि यहुदिंना ‘नरकात’ जायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
नर्सच्या या दाव्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलिया पोलीस आणि न्यू साउथ वेल्सच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे की, नर्सच्या दाव्याची चौकशी करत आहोत. आरोग्य विभायाने कडक कारवाई या दोघांनाही कामावरून काढून टाकले आहे. पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, या प्रकरणामुळे मला धक्का बसला आहे. धार्मिक द्वेषामुळे रुग्णालयातील नर्स दुसऱ्या धर्मातील रुग्णाबाबत असा कसा विचार करू शकतात, त्यांना कसे मारू शकतात.