न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी एका कार्यक्रमात व्याख्यान देताना मुंबई बॉम्बस्फोटसह २६/११ हल्ल्याच्या खटल्यातील काही पैलू उघड केले. विदर्भ लेडी लॉयर असोसिएशनच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या सभागृहात न्या. गोविंद सानप यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निर्णय सुनावण्यापूर्वी बदलीची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर होती.
२०११ साली न्या. गोविंद सानप यांची नेमणूक विशेष टाडा न्यायालयात झाली आणि या कायद्याच्या अंतर्गत मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्याची सुनावणी झाली. २०१७ साली त्यांनी खटला पूर्ण करत निर्णय सुनावला. मात्र, हा निर्णय देण्यापूर्वी त्यांच्यावर बदलीची टांगती तलवार असल्याचे त्यावेळी सानप यांच्या लक्षात आले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. बदलीची टांगती तलवार असल्याचे लक्षात येताच त्यांना मोठा धक्का बसला होता. याबाबत त्यांनी तत्कालीन वरिष्ठ न्यायमूर्तींना याची माहिती दिली. वरिष्ठ न्यायमूर्तींनी यात दखल देत त्यांच्या बदलीचा आदेश थांबविला आणि त्यांना बॉम्बस्फोट प्रकरणाचा निर्णय देता आला, असे न्या. गोविंद सानप यांनी सांगितले.
मुंबई स्फोट खटल्यादरम्यान फार दबाब होता आणि अनेक आव्हांनाना सामोरे जावे लागत होते. तेव्हा त्यांनी त्यांची चिंता आपल्या मुलांकडे व्यक्त केली. शिवाय या प्रकरणातून माघार घेण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचेही त्यांनी कुटुंबियांना सांगितले होते. मात्र, त्यांच्या मुलांनी त्यांना रोखले आणि याचा निकाल देत इतिहास घडविण्याची तसेच बॉम्बस्फोटातील पिडीतांना न्याय देण्याची संधी असल्याची जाणीव करून दिली. माघार घेणे योग्य नसल्याचे म्हणत आग्रह केला. अखेर गोविंद सानप यांनी सर्व अडथळे आणि आव्हानांना सामोरे जात निर्णय दिला, अशी आठवण न्या. गोविंद सानप यांनी सांगितली.
हे ही वाचा :
ममता कुलकर्णी यांचा यु- टर्न; किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावर कायम
आणखी अनधिकृत भारतीय अमेरिकेतून येणार
ट्रम्प म्हणाले, बांगलादेशाबाबत मोदींनी निर्णय घ्यावा, आमची काहीही भूमिका नाही!
तुर्कीने काश्मीर मुद्द्यावर पुन्हा खुपसले नाक
विदर्भ लेडी लॉयर असोसिएशनच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या सभागृहात न्या. गोविंद सानप यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे उपस्थित होते.