30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
घरविशेषऑस्ट्रेलियाने जिंकले पहिले कसोटी अजिंक्यपद

ऑस्ट्रेलियाने जिंकले पहिले कसोटी अजिंक्यपद

भारत २०९ धावांनी पराभूत

Google News Follow

Related

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारताला २०९ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे ऑस्ट्रेलियाने कसोटी जगतावर प्रथमच आपला झेंडा फडकावला. कसोटी अजिंक्यपद जिंकण्याची ही ऑस्ट्रेलियाची पहिलीच वेळ आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताला अखेरच्या दिवशी जिंकण्यासाठी २८० धावांची गरज होती. भारताने त्याआधी तीन विकेट्स गमावल्या होत्या. अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली मैदानात होते पण भारताचा दुसरा डाव अवघ्या २३४ धावांत आटोपला.

भारत या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आता दोनवेळा उपविजेता ठरला आहे. पण भारतीय संघाने गेल्या चार कसोटी मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. त्यातील दोन मालिका भारतात झालेल्या आहेत, असे असतानाही भारताला या अंतिम सामन्यात मात्र तो चमत्कार दाखवता आला नाही.

भारताने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला रोखण्याचा प्रयत्न केला. पण स्टीव्ह स्मिथ आणि ट्राव्हिस हेड यांनी केलेल्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाला ४६९ धावापर्यंत मजल मारता आली. ही धावसंख्या पार करणे भारताला आपल्या पहिल्या डावात शक्य झाले नाही. केवळ २९६ धावांपर्यंत भारत मजल मारू शकला. १७३ धावांची पिछाडी ही भारतासाठी डोकेदुखी ठरली. त्यामुळेच दुसऱ्या डावात भारताला ते आव्हान पेलता आले नाही.

अखेरच्या दिवशी २८० धावा हव्या असताना भारताची मदार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर होती. मात्र ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज बोलँडने टाकलेल्या चेंडूने विराटच्या बॅटला स्पर्श केला आणि स्लिपमध्ये तो झेलचीत झाला. अजिंक्यसह त्याने ८६ धावांची भागीदारी केली होती. त्याच षटकात बोलँडने रवींद्र जाडेजाला खातेही उघडू न देता बाद केले. भारताची स्थिती अवघड होत गेली आणि जिंकण्याची आशा मावळत गेली.

हे ही वाचा:

सतत रडणे,गप्प गप्प राहणे; ओडिशा अपघातातील जखमी मनोविकाराने ग्रस्त

बॅडमिंटन खेळल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचे निधन

ठीक वर्षापूर्वी मविआची भाकरी करपली होती, आज अजित पवारांची करपली!

‘गदा’ कुणाकडे? भारत की ऑस्ट्रेलिया, भारताला हव्यात २८० धावा, ७ विकेट्स शिल्लक

पहिल्या डावात दमदार ८९ धावांची खेळी करणारा अजिंक्य रहाणे यावेळी मात्र मोठी खेळी उभारू शकला नाही. के.एस. भारतसह त्याने सहाव्या विकेटकरिता ३३ धावांची भागीदारी केली. पण मिचेल स्टार्कच्या चेंडूवर शरीरापासून लांब खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. स्टार्कचा हा या सामन्यातील पहिलाच बळी होता. आता आगामी ऍशेस मालिकेत स्टार्कला संधी मिळेल का, याविषयी चर्चा आहे. जर जोस हेझलवूड तंदुरुस्त असेल तर स्टार्कची संधी हुकणार आहे.

अजिंक्य बाद झाल्यानंतर शार्दुलही बाद झाला. लायनने त्याला पायचीत पकडले. त्यानंतर उपाहाराच्या आधीच भारताचा डाव आटोपला. पहिल्या डावात १६३ धावांची खेळी करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्राव्हिस हेड याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले.

ऑस्ट्रेलियाचे हे नववे आयसीसी विजेतेपद असून आतापर्यंत आयसीसीच्या विविध स्पर्धांमध्ये एकदा तरी विजेतेपद मिळविण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. त्यांनी आतापर्यंत पाच वनडे वर्ल्डकप, दोन चॅम्पियन्स ट्रॉफी, एक टी-२० वर्ल्डकप आणि आता कसोटी अजिंक्यपद स्पर्धा.

 

स्कोअरबोर्ड

ऑस्ट्रेलिया ४६९ (हेड १६३, स्मिथ १२१, सिराज १०८-४) आणि ८ बाद २७० डाव घोषित (कॅरी ६६, जाडेजा ३-५८) विजयी वि. भारत २९६ (रहाणे ८९, ठाकूर ५१, कमिन्स ३-८३) आणि २३४ (कोहली ४९, लायन ३-४१, बोलँड ३-४६)

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा