32 C
Mumbai
Saturday, November 28, 2026
घरविशेष‘बाहुबली २’चा विक्रम मोडला! ‘रामायण’ जगभरातील कमाईत तिसऱ्या स्थानी

‘बाहुबली २’चा विक्रम मोडला! ‘रामायण’ जगभरातील कमाईत तिसऱ्या स्थानी

प्रदर्शनाच्या २३ दिवसांत १,७९० कोटींची कमाई

Google News Follow

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘बाहुबली २ : द कन्क्लुजन’चा विक्रम अखेर मोडला आहे. रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाने जगभरातील कमाईच्या बाबतीत ‘बाहुबली २’ला मागे टाकत भारतीय चित्रपटांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या २३ दिवसांत ‘रामायण’ने हा मोठा टप्पा गाठला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर आता ‘रामायण’ची चर्चा रंगली आहे.

‘रामायण’ने २३ दिवसांत जगभरात १ हजार ७९०.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर प्रभासच्या ‘बाहुबली २’ची पूर्ण जागतिक कमाई १ हजार ७८८.०६ कोटी रुपये होती. अशा प्रकारे ‘रामायण’ने हा आकडा ओलांडत ‘बाहुबली २’ला चौथ्या स्थानावर ढकलले आहे. भारतीय चित्रपटांच्या जागतिक कमाईच्या यादीत आता ‘दंगल’ पहिल्या, ‘धुरंधर २’ दुसऱ्या आणि ‘रामायण’ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतातही हजार कोटींचा टप्पा पार

जागतिक स्तरावर विक्रम नोंदवतानाच ‘रामायण’ने भारतातही एक हजार कोटी रुपयांच्या निव्वळ कमाईचा टप्पा पार केला आहे. २३ व्या दिवशी चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ८.४५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे भारतातील एकूण निव्वळ कमाई १ हजार ०००.५५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर भारतातील एकूण ग्रॉस कमाई १ हजार १९५.१० कोटी रुपये झाली आहे. चित्रपटाच्या परदेशातील कमाईचाही या विक्रमात मोठा वाटा आहे. आतापर्यंत परदेशात चित्रपटाने ५९५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. २३ व्या दिवशी परदेशातून आणखी पाच कोटी रुपये मिळाले.

हे ही वाचा : 

अफगाणिस्तानमध्ये शाळेत भीषण स्फोट

चीनच्या साथीने पाकिस्तानची अंतराळ सज्जता भारतासाठी धोक्याची घंटा!

डिलिमिटेशन विधेयकाला द्रमुकचा पाठिंबा

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत ५६ एकरांवर ‘राष्ट्र वंदनम्’

मोठा विक्रम नोंदवणाऱ्या ‘रामायण’च्या रोजच्या कमाईत मात्र आता घट दिसत आहे. २३ व्या दिवशी भारतातील कमाई आदल्या दिवसाच्या तुलनेत १२.४ टक्क्यांनी कमी झाली. असे असले तरी जगभरातील एकूण कमाईच्या बाबतीत चित्रपटाने ‘बाहुबली २’ला मागे टाकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा