34 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरविशेषजय 'बजरंग'!!

जय ‘बजरंग’!!

Google News Follow

Related

भारताचा कुस्तीपटु बजरंग पुनिया याने इराणच्या पहिलवानाला चीत करत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे भारतीयांना असणाऱ्या पदकाच्या आशा उंचावल्या आहेत.

कुस्ती या क्रीडा प्रकारात भारताला ऑलिम्पिकमध्ये सातत्याने साथ दिली आहे. रवि कुमार दहिया याने कालच रौप्य पदकाची कमाई केली होती, तर आता बजरंग पुनिया याने इराणच्या पहिलवानाला उपांत्यपूर्व फेरीत हरवून उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे.

बजरंग पुनियाने पुरूष फ्रिस्टाईल कुस्ती ६५ किलो. वजनी गटामध्ये इराणच्या मोर्तेझा घियासी याच्याशी लढत दिली होती. या रोमहर्षक लढतीमध्ये सुरूवातीला घियासीला एक गुण देखील मिळाला होता. परंतु त्यानंतर पुनियाने जोरदार वापसी केली. त्याने दोन गुण तर मिळवलेच शिवाय एका क्षणाला त्याने घियासीला चीतपट केले. घियासीचे खांदे त्याने जमिनीवर टेकवले त्यामुळे सामना निर्धारित वेळेच्या आधीच संपवून पुनिया याला विजयी म्हणून घोषित करण्यात आले. या लढती आधी त्याने किर्गिझस्तानच्या पहिलवानाला देखील पराभूत केले होते.

बजरंग पुनिया आता उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तिथे विजयी झाल्यास तो अंतिम फेरीत धडक देईल. अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर तो सुवर्ण पदकासाठी झुंज देईल. एकूण पुन्हा एकदा कुस्तीमधून भारताला आणखी एका पदकाची कमाई करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल.

कुस्तीत भारताची ही कामगिरी सुरू असताना गोल्फ मध्ये देखील भारताची घोडदौड सुरू आहे. भारताची महिला गोल्फ खेळाडू अदिती अशोक हीने दुसऱ्या स्थानासाठी बरोबरी केली आहे. या खेळाची सध्या तिसरी फेरी चालू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा