27 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरविशेषएजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला!

एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला!

भाजपा आमदार चित्रा वाघ यांची माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी 

Google News Follow

Related

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विविध चित्रपट आणि शो मधील वाढते अश्लील कंटेंट मोठे प्रश्न निर्माण करत आहे. अशामुळे मोठ्यांपासून लहान मुलांवर परिणाम होत असल्याने यावर बंदी आणण्याची मागणी अनेकांकडून होत आहे. भारत सरकारने अशा अनेक ओटीटी आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्मना नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करत बंदी घातली आहे. याच मालिकेत आता अभिनेता एजाज खान याच्या ‘हाऊस अरेस्ट’ या शो वर बंदी घालण्याची मागणी होत आहे. भाजपा महिला आमदार चित्रा वाघ यांनी ही मागणी केली आहे. आमदार चित्रा वाघ यांनी एक्सवर ट्वीटकरत उल्लू ॲपसह असे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ॲप्सवर तातडीने बंदी घालण्याची विनंती माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

आमदार चित्रा वाघ यांनी ट्वीटकरत म्हटले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!” एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला. “स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ नावाचा शो हा केवळ अश्लीलतेचा कळस आहे. उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता मुक्तपणे सोशल मीडियावर फिरत आहेत, जे अत्यंत घाणेरडे आहेत.

हे ही वाचा : 

बीएसएफने दहशतवादी कटकारस्थान उधळलं

फौजिया बेगमने ३० वर्षांनी केले जन्मप्रमाणपत्र, सोमय्यांनी केली पोलखोल

हाफिझ सईदसाठी पाकिस्तान एकवटला, दिली चार पट सुरक्षा!

आम्ही सज्ज! शत्रूला INS सूरतच्या कमांडिंग ऑफिसरचा इशारा

त्या पुढे म्हणाल्या, लहान मुलांच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा कंटेंट सहज पोहोचतो आहे. असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही, तर समाजाच्या आरोग्याची विटंबना आहे. असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घाला आहे. मी माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना विनंती करते की उल्लू ॲपसह असे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ॲप्सवर तातडीने बंदी घालावी. “हाऊस अरेस्ट नावाचा शो हा निव्वळ कंटेंट नाही, तर समाजाच्या मूल्यांवर आघात आहे,” असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा