27 C
Mumbai
Thursday, June 20, 2024
घरविशेषरोमहर्षक सामन्यात बांगलादेशने उडवला श्रीलंकेचा धुव्वा

रोमहर्षक सामन्यात बांगलादेशने उडवला श्रीलंकेचा धुव्वा

Google News Follow

Related

टी-२० विश्वचषकात एकामागोमाग आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळताहेत. मोठी उलटफेर या विश्वचषकात होताना दिसत आहे. अमेरिकेने पाकिस्तानला लोळवल्यानंतर, अफगाणिस्ताने न्यूझिलंडला पराभूत केले. ही उलटफेर इतक्यावरच न थांबता आता बांगलादेशने श्रीलंकेला लोळवले आहे.

डॅलस येथील ग्रँड पायरी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा २ गडी राखून पराभव केला. दोन्ही संघ शेवपर्यंत झुंजले. लक्ष्याचा पाठलाग करताना तौहीद हृदयॉयने बांगलादेशसाठी २० चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने झुंजार ४० धावांची सर्वात मोठी खेळी केली. श्रीलंकेच्या नुवान तुषाराने सर्वाधिक ४ विकेट्स घेतले.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो त्यांच्यासाठी घातक ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेला बांगलादेशी गोलंदाजांनी २० षटकांत ९ बाद १२४ धावांवर रोखले. मुस्तफिझूर आणि रिशादने ३-३ विकेट्स घेतले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या डावातही चढ-उतार येत होता. बांगलादेशी ओपनर्सनी निराशा केली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाज लिटन दास आणि हृदयय यांनी डावाची धुरा सांभाळली. पण शेवटी संघ पुन्हा गडबडला आणि तळातील फलंदाजांनी अतिशय रोमांचक विजयाची नोंद केली. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशचा श्रीलंकेविरुद्धचा हा पहिला विजय ठरला.

डावाच्या शेवटच्या क्षणी श्रीलंकेच्या गोलंदाजांनी बांगलादेशला काही महत्त्वाचे धक्के दिले. नुवान तुषाराने डावाच्या १८व्या षटकात फक्त ३ धावा देत २ विकेट्स घेतले. या षटकानंतर सामना पुन्हा एकदा श्रीलंकेच्या बाजूने आला, मात्र शेवटी बांगलादेशने बाजी मारली.

बांगलादेशच्या बाजूने सामना कसा फिरला?


१२५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशला पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सौम्या सरकारच्या रूपाने पहिला धक्का बसला. सरकारला भोपळाही फोटता आला नाही, धनंजय डीसिल्वाचा तो बळी ठरला. त्यानंतर संघाने दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तनजीद हसनच्या रूपाने दुसरी विकेट गमावली. त्याने ६ चेंडूत केवळ ३ धावा केल्या. यानंतर कर्णधार नझमुल हुसेन शांतो पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधाराने १३ चेंडूत केवळ ७ धावा केल्या.

त्यानंतर चौथ्या विकेटसाठी तौहीद हृदयय आणि लिटन दास यांनी ६३ धावांची (३८ चेंडू) भागीदारी करून संघाला अडचणीतून बाहेर काढले. बाराव्या षटकात हसरंगाने चांगली खेळी खेळणाऱ्या तौहीद हृदयॉयला पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यावर ही भागीदारी संपुष्टात आली. तौहीदने २० चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. त्यानंतर लिटन दासही १५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. लिटन दासने ३८ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या.

हेही वाचा :

लखनऊनंतर दिल्ली, कर्नाटकात राहुल गांधींचे १ लाख घेण्यासाठी रांगा

सुरक्षा अधिकारीच हात उचलू लागले तर कोणीही सुरक्षित राहू शकत नाही

८० पैकी ६ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची उत्तर प्रदेशात ‘धन्यवाद यात्रा’

‘एनडीए’च्या बैठकीत हृदयाच्या आकाराच्या पानांनी वेधले लक्ष

यानंतर १७व्या षटकात शाकिब अल हसन आणि १८व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रिशाद हुसेन बाद झाला. शाकिबने ८ तर रिशदने १ धावा केल्या. बांगलादेशची पडझड येथेच थांबली नाही. रिशादनंतर पुढच्याच चेंडूवर नुवान तुषारने मुस्तफिझूर रहमानला गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर महमुदुल्लाह आणि तंजीम हसन साबिक यांनी नाबाद १२ धावांची छोटी पण अखंड भागीदारी केली आणि संघाला विजयापर्यंत नेले. महमुदुल्लाहने १३ चेंडूत १ षटकाराच्या मदतीने नाबाद १६ धावा आणि तंजीम नाबाद १ धावा केल्या.

श्रीलंकन गोलंदाजांची कामगिरी
श्रीलंकेकडून नुवान तुषाराने सर्वाधिक ४ विकेट्स घेतले. त्याने ४ षटकात केवळ १८ धावा दिल्या. याशिवाय कर्णधार वनिंदू हसरंगाने २ विकेट्स घेतले. हसरंगाने ४ षटकात ३२ धावा दिल्या. बाकी धनंजय डी सिल्वा आणि मथिशा पाथिराना यांना १-१ विकेट्स मिळाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा