आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भारत-बांगलादेश सीमेवरील ‘चिकन नेक’ भागात वाढणाऱ्या बांगलादेशी प्रभावावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या भागात बांगलादेशकडून नागरिकांमध्ये देशभक्तीऐवजी बांगलादेशी निष्ठा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जे भविष्यात भारताच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकतात.
मुख्यमंत्री सरमा म्हणाले, “मागच्या वेळी जेव्हा मी धुब्री भागात गेलो होतो, तेव्हा भिंतींवर असे लेखन दिसले की, ‘धुब्रीतील लोकांनी बांगलादेशाशी निष्ठा दाखवावी’. हा भाग ‘चिकन नेक’ मध्ये येतो. आता या चिकन नेकच्या दोन्ही बाजूंना असे लोक राहतात, जे मूळचे बांगलादेशातून आलेले आहेत.”
ते पुढे म्हणाले, “चिकन नेक हा अत्यंत संवेदनशील भाग आहे, कारण संपूर्ण २२ किमीच्या पट्ट्यात राहणारे बहुतांश लोक पूर्वी बांगलादेशातून आलेले आहेत, कदाचित १९५१ किंवा १९७१ पूर्वी. हे लोक आता भारतीय नागरिक झाले असले तरी, बांगलादेश त्यांना सतत हेच आठववत आहे की ‘तुम्ही मूळचे भारतीय नाहीत’.”
सरमा यांच्या म्हणण्यानुसार, बांगलादेश सरकार किंवा त्यांच्या संबंधित गटांकडून या नागरिकांमध्ये पुन्हा ‘बांगलादेशी ओळख’ जागवण्याचा प्रयत्न होत आहे. “हे त्यांच्यात पुन्हा बांगलादेशी भावना जागवून देशविरोधी मनोवृत्ती तयार करण्याचा प्रयत्न आहे. ही बाब देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर ठरू शकते.”
हे ही वाचा :
“पंतप्रधान मोदी बिहारला आले की महाआघाडीचे नेते थरथर कापतात”
“लसीकरणानंतर भटक्या कुत्र्यांना मूळ भागातच सोडा”
संसद भवनात घुसखोरीची घटना: भिंत ओलांडून गरुड गेटपर्यंत पोहोचलेला आरोपी अटकेत!
“पंतप्रधानांचा दौरा: बिहारमध्ये १३,००० कोटींचे प्रकल्प, कोलकाता मेट्रोला नवे टप्पे”
चिकन नेक म्हणजे काय?
‘चिकन नेक’ किंवा सिलीगुडी कॉरिडॉर हा भारताचा एक संवेदनशील भूभाग आहे, जो देशाच्या ईशान्य राज्यांना मुख्य भारताशी जोडतो. तो २२ किमी रुंद असून, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि चीनच्या सीमेच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे येथे कुठल्याही प्रकारचा राष्ट्रविरोधी प्रभाव हा थेट भारताच्या एकात्मतेला आव्हान देऊ शकतो.
#WATCH | Guwahati | Assam CM Himanta Biswa Sarma says, "Last time when I visited Dhubri, we saw wall writing asking people of Dhubri district to show allegiance to Bangladesh. That area falls in the chicken neck. Now, both sides of the chicken neck have people who are originally… pic.twitter.com/SSXfHLwtDI
— ANI (@ANI) August 22, 2025







