27 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेषउद्धव ठाकरे म्हणजे 'आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट'

उद्धव ठाकरे म्हणजे ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट’

बदलापूर प्रकरणावरून बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Google News Follow

Related

बदलापूर अत्याचार प्रकारावरून सध्या राज्यात राजकारण केलं जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास होऊन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी सरकारची भूमिका असून तसे प्रयत्न सुरु आहेत, या घटनेचे विरोधकांनी राजकारण करु नये, असे मुख्यंमत्री शिंदे, म्हणाले आहेत. दरम्यान, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (२२ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. बदलापूरच्या घटनेत राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्रीसुद्धा विकृतच, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या काळातील गुन्ह्यांच्या घटनांची यादी समोर आणत आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट,” अशी गत उद्धव ठाकरे यांची झाली असल्याचे बावनकुळेंनी म्हटले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्विटकरत लिहिले की, उद्धवजी कशाला दिशाभूल करता? तुम्ही मुख्यमंत्री होते तेंव्हा हिंगणघाट, भोपर, साकीनाका, नांदेड, पुणे, बीड, सिंधुदुर्ग.. घडले. “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट,” अशी गत उद्धव ठाकरे यांची झाली आहे. कोलकत्ता, हाथरस, उनाव येथील घटनांवर तुम्ही बोलता. पण आश्चर्य आहे, तुम्ही ज्यांच्या मांडीवर बसून नैतिकतेच्या गप्पा करता, बदलापूरच्या घटनेआडून राजकारण करता त्या काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात कित्ती भयंकर घडले होते. तेही कारनामे जरा आठवा. जनतेला ऐकवा. तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही आठवा. जनतेला कळू द्या. आपले झाकून ठेवून कित्ती दिवस जनतेची दिशाभूल करणार उद्धवजी, असा सवाल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

हे ही वाचा :

स्वामी, सलाहउद्दीन राहुल गांधी यांचा बाजार उठवणार ? इतिहासाची पुनरावृत्ती होणार…

अयोध्या बलात्कार प्रकरणातील आरोपी मोईद खानचे शॉपिंग कॉम्प्लेक्स ‘भुईसपाट’

विवाहित महिलेवर बलात्कार करणाऱ्या तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्त्यावर गुन्हा

शाळेमध्येच मुली सुरक्षित नसतील तर, शिक्षण अधिकाराचा उपयोग काय?

 

बावनकुळेंनी घटनांची माहिती देत लिहिले की, २२ ऑगस्ट २०१३ रोजी, म्हणजे ११ वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी मुंबईतील शक्ती मिलमध्ये प्रेस फोटोग्राफर असलेल्या २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. तेंव्हा सरकार काँग्रेस -राष्ट्रवादीचे होते. हिंगणघाटमध्ये भर रस्त्यात तरुण प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळले होते. तेव्हा तर उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होते आणि वसुली सम्राट गृहमंत्री होते.

डोंबिवलीच्या भोपरमध्ये १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. ३३ आरोपींची नावं समोर आली होती. तेंव्हाही उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि, वसुलीसम्राट गृहमंत्री होते. मुंबईतील साकीनाका, नांदेड, पुणे, बीड, सिंधुदुर्ग.. येथील सामूहिक बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला होता. तेंव्हाही उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि, वसुलीसम्राट गृहमंत्री होते.

या सर्वच घटनांचा आम्ही निषेध करतो, आरोपीना कडक शिक्षा व्हावी, यासाठी पुढाकार घेतो. पण तुम्ही ‘उठता बसता’ राजकारण करता. उद्धवजी, हे निषेधार्ह आहे. तुमचा दुतोंडीपणा जनता ओळखून असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची राज्य सरकारने दखल घेऊन आरोपीला ताब्यात घेतले असून संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारांचे वाढते प्रमाण थांबवण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्या, शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आणि शासकीय आयटीआय संस्थांमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नवे निर्देश लागू केले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा