30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरविशेष९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे

९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे

Google News Follow

Related

९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्येच ९५ वे साहित्य संमेलन हे लातूरच्या उदगीरमध्ये होणार असल्याचे सांगितले होते. पुढील साहित्य संमेलन चार महिन्याच्या आत होणार असल्याची माहिती नाशिक येथील साहित्य संमेलनामध्ये देण्यात आली होती. त्यामुळे येत्या तीन महिन्यात संमेलनाची तारीख निश्चित होणार असून दरम्यान या संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड झाली आहे.

कोण आहेत भारत सासणे?

जालना येथे भारत सासणे यांचा जन्म २७ मार्च १९५१ रोजी झाला. अहमदनगर महाविद्यालयातून त्यांनी बी.एससी ही पदवी घेतली. १९८० नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये एक अग्रगण्य आणि महत्त्वाचे कथा लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. भारत सासणे यांनी वैजापूरला ४ एप्रिल २०१० रोजी झालेल्या ५व्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून जबाबदारी बजावली होती. सासणे यांनी २०१४ मध्ये बहिर्जी शिक्षण संस्थेतर्फे वसमत येथे आयोजित ३५व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. २०१६ मध्ये नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे अध्यक्षपद भूषवले होते.

हे ही वाचा:

जावई समीर खान अडचणीत येताच नवाब मलिक यांची एनसीबी विरोधात पुन्हा बोंबाबोंब

समाजकार्याच्या नावावर भलतेच कार्य करणाऱ्या संस्थाना मोदी सरकारचा दणका

… हे आहे बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टर दुर्घटनेमागचे खरे कारण

शिवसेनेला राज्यपालांकडून दणका; आश्रय योजनेची होणार चौकशी

भारत सासणे यांनी अनेक कथा लिहिल्या असून यातून समाजाच्या सर्वच स्तरावरील लोकांचे दर्शन घडते. या कथांमधून गंभीर, शोकाकुल अशा भावजीवनाचा प्रत्यय येतो. त्यांच्या कथांतून व्यक्तीच्या आत्मशोधाच्या प्रक्रियेचे चित्रण जसे आढळते, तसेच स्त्री-पुरुषांतील परस्पर आकर्षणामागचे गूढ, तरल, सूक्ष्म मनोव्यापारही ते कौशल्याने उलगडून दाखवतात. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचे पुरस्कार, तसेच इतरही मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. भारत सासणे यांच्या ‘डफ’ या दीर्घ कथेवर प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे हे ‘काळोखाच्या पारंब्या’या नावाचा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा