32 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरविशेषबिहार मंत्रिमंडळ विस्तार: नितीश कुमार सरकारमध्ये भाजपाच्या ७ नव्या चेहऱ्यांचा समावेश!

बिहार मंत्रिमंडळ विस्तार: नितीश कुमार सरकारमध्ये भाजपाच्या ७ नव्या चेहऱ्यांचा समावेश!

राज्यपालांनी दिली शपथ, दोन दिवसानंतर सुरु होतंय अर्थसंकल्पीय अधिवेशन

Google News Follow

Related

या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने बुधवारी (२६ फेब्रुवारी) मंत्रिमंडळाचा विस्तार केला. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या एकूण सात आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. निवडणुकीपूर्वी झालेला मंत्री मंडळाचा विस्तार महत्त्वाचा मानला जात आहे.

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या सात आमदारांमध्ये संजय सरावगी (दरभंगा), सुनील कुमार (बिहारशरीफ), जिबेश कुमार (जाले), राहू कुमार सिंग (साहेबगंज), मोती लाल प्रसाद (रिगा), विजय कुमार मंडल (सिकटी) आणि कृष्ण कुमार मंटू (अमनूर) यांचा समावेश आहे. बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आमदारांना मंत्री पदाची शपथ दिली.

“पक्षाचा कार्यकर्ता आणि आमदार म्हणून, मला नेहमीच जबाबदाऱ्या पार पाडण्याची सवय आहे. ही भूमिका माझ्यासाठी नवीन असली तरी, संघटनेत काम करताना मिळालेला अनुभव मला नक्कीच मदत करेल. मला कोणतेही खाते सोपवले तरी मी माझे कर्तव्य पूर्ण समर्पणाने पार पाडेन,” असे शपथ घेतल्यानंतर मोतीलाल प्रसाद म्हणाले.

हे ही वाचा : 

ईदच्या अतिरिक्त सुट्टीसाठी विश्वकर्मा पुजेची सुट्टी रद्द

सुदानमधील ओमदुरमन येथे लष्करी विमान कोसळले; ४६ जणांचा मृत्यू, १० जखमी!

दिल्ली विधानसभेत आज कॅग अहवाल सदर होणार

ग्रीन कार्डच्या धर्तीवर जाहीर केलेली ट्रम्प यांची ‘गोल्ड कार्ड’ योजना काय आहे?

दरम्यान, आदल्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना जयस्वाल म्हणाले, “मी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे. ‘एक व्यक्ती, एक पद’ हे पक्षाचे धोरण आहे. केंद्रीय नेतृत्वाने मला पक्षाच्या राज्य युनिटची जबाबदारी दिली आहे याबद्दल मी आभारी आहे. शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) बिहारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या दोन दिवस आधी हा विस्तार करण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा