सुदानची राजधानी खार्तूमच्या बाहेर एका लष्करी विमानाचा अपघात झाला आहे. या विमान अपघातात ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० हून अधिक जखमी झाले आहेत. मंगळवारी (२५ फेब्रुवारी) उशिरा लष्कराने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमान अपघातात लष्करी कर्मचारी आणि नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी अपघातस्थळी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले आहे.
सुदानच्या लष्कराने सांगितले की, मंगळवारी ओमदुरमनच्या उत्तरेकडील वाडी सय्यदना हवाई तळावरून उड्डाण घेण्याच्या प्रयत्नात असताना अँटोनोव्ह विमान कोसळले. या अपघातात शहरातील करारी जिल्ह्यातील अनेक घरांचेही नुकसान झाले.
अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांचे मृतदेह ओमडुरमनमधील नाऊ रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. अपघातानंतरचे व्हिडीओ समोर आले आहेत. व्हिडीओमध्ये संपूर्ण विमानाला आग लागल्याचे दिसत आहे. तर अनेकजण बचावकार्य करताना दिसत आहेत.
हे ही वाचा :
दिल्ली विधानसभेत आज कॅग अहवाल सदर होणार
महाशिवरात्र: दिवसातून दोनदा अदृश्य होणारे शिवमंदिर; काय आहे कथा?
ग्रीन कार्डच्या धर्तीवर जाहीर केलेली ट्रम्प यांची ‘गोल्ड कार्ड’ योजना काय आहे?
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांकडून लष्कराच्या वाहनावर गोळीबार
दरम्यान, विमान कोसळलेल्या भागात अनेक घरांचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. उत्तर ओमडुरमनमधील रहिवाशांनी सांगितले की विमान अपघातामुळे मोठा स्फोट झाला, ज्यामुळे जवळपासच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, गेल्या महिन्यातही दक्षिण सुदानमध्ये एक विमान अपघात झाला होता. या विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह २१ लोक होते. विमान अपघातात किमान २० जणांचा मृत्यू झाला होता.