33 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरविशेषफौजिया बेगमने ३० वर्षांनी केले जन्मप्रमाणपत्र, सोमय्यांनी केली पोलखोल

फौजिया बेगमने ३० वर्षांनी केले जन्मप्रमाणपत्र, सोमय्यांनी केली पोलखोल

बांगलादेशी जन्मप्रमाणपत्र घोटाळ्याची कहाणी

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या हे बांगलादेशी घुसखोरांविरोधात सध्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटला अशीच एक कहाणी उलगडून सांगितली आहे.

सोमय्या यांनी म्हटले आहे की, गफ्फार खान यांनी मार्च २०२४ मध्ये, तब्बल ३० वर्षांनंतर जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्रासाठी त्याची मुलगी फौजिया बेगमसाठी अर्ज केला संभाजीनगर (महाराष्ट्र) येथील उपविभागीय अधिकारी (संभाजीनगर कलेक्टर) यांनी स्थानिक प्रशासनाला आदेश दिला की, फौजिया बेगमचे नाव जन्मनोंदणीमध्ये समाविष्ट करून जन्म प्रमाणपत्र जारी करावे.

दौलताबाद ग्राम पंचायतने फौजिया बेगमला जन्म प्रमाणपत्र दिले. त्यात नोंद होती की, तिचा जन्म ०७ फेब्रुवारी १९९४ रोजी दौलताबाद, संभाजीनगर येथे झाला आहे.

शाळेचे बनावट प्रमाणपत्र 

फौजिया बेगम •जन्म तारीख: ७ फेब्रुवारी १९९४ •शाळेत प्रवेश: १३ जून १९९७ •प्रवेश वर्ग: दुसरा •शाळा सोडण्याची तारीख: २१ ऑगस्ट २००३ •शाळा सोडली: इयत्ता ७ वी शिकत असताना.

शाळेचे प्रमाणपत्र, उपविभागीय अधिकारी आणि स्थानिक संस्था असे म्हणतात की: “फौजियाने इयत्ता दुसरीत प्रवेश घेतला तेव्हा ती फक्त ३ वर्षांची होती… आणि इयत्ता ७ वीत शाळा सोडली तेव्हा ती ९ वर्षांची होती…” या अर्जासोबत इतर कोणतेही कागदपत्र सादर करण्यात आलेले नाही.

हे ही वाचा:

अमृतसर: पाकिस्तानी सीमेवर बीएसएफकडून ५ हँडग्रेनेड, ३ पिस्तूलांसह अनेक शस्त्रे जप्त!

पहलगाममधील हल्लेखोर कदाचित दक्षिण काश्मीरमध्ये लपून बसलेत!

भारतासोबतच्या तणावादरम्यान पाकिस्तानच्या आयएसआय प्रमुखाला महत्त्वाची भूमिका!

भारताच्या इशाऱ्याला न जुमानता पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरूच!

फौजिया बेगमला तिच्या जन्मानंतर तब्बल ३० वर्षांनी जन्मनोंदणी व प्रमाणपत्र मिळाले आणि आता फौजिया बेगम बनली भारतीय नागरिक. “बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचे” हे एक उदाहरण आहे, असे सोमय्या म्हणतात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान (जुलै ते डिसेंबर २०२४) अशा हजारो उशिराने जन्मतारीख नोंदवलेल्या आणि प्रमाणपत्र जारी झालेल्या प्रकरणांपैकी हे एक प्रकरण आहे. आता घोटाळा उघडकीस आला असून, महाराष्ट्रभर आतापर्यंत २४ एफआयआर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास आणि कार्यवाही सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा