अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज (१४ जून) आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत मोठी माहिती सांगितली. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला आहे आणि डेटा डीकोड केला जात आहे, तर अनेक एजन्सी आणि उच्चस्तरीय पॅनेल या घटनेची व्यापक चौकशी करत आहेत. दरम्यान, ब्लॅक बॉक्स डेटामुळे अपघाताच्या कारणाबद्दल महत्त्वाची माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.
“मंत्रालय या घटनेला अत्यंत गांभीर्याने घेत आहे. विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) तात्काळ तैनात करण्यात आले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एएआयबीचे महासंचालक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत. एएआयबीमार्फत तांत्रिक तपास पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी ५ वाजता अपघातस्थळावरून ब्लॅक बॉक्स सापडला,” असे मंत्री नायडू म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ” ब्लॅक बॉक्सचे हे डीकोडिंग अपघातादरम्यान किंवा अपघातापूर्वीच्या काही क्षणांमध्ये प्रत्यक्षात काय घडले असेल याची सखोल माहिती देईल, असा एएआयबीला विश्वास आहे. एएआयबीने संपूर्ण चौकशी केल्यानंतर निकाल किंवा अहवाल काय येईल, याची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत.”
हे ही वाचा :
एअर इंडियाच्या विमान अपघातातील मृतांची संख्या २७० वर!
नीट यूजी : महेश कुमार ६८६ गुणांसह देशात अव्वल
विमान अपघात : चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत
भारत-पाकिस्तान दरम्यान तिसऱ्या पक्षाची ढवळाढवळ नको
घटना घडल्यानंतर बोईंग ७८७ मालिकेतील विमानांची विस्तारित देखरेख करण्याची गरज असल्याचे आम्हाला वाटले. डीजीसीएने ७८७ विमानांची विस्तारित देखरेख करण्याचे आदेश देखील दिले आहेत. आज आमच्या भारतीय विमान ताफ्यात ३४ विमाने आहेत. मला वाटते की ८ विमानांची आधीच तपासणी झाली आहे आणि उर्वरित विमानांची तातडीने तपासणी केली जाईल,” असे ते पुढे म्हणाले.







