शनी शिंगणापूर देवस्थानातून १६७ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, ज्यामध्ये ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश होता. देवस्थानात मोठ्या संख्येने मुस्लिम कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती मिळताच सकल हिंदू समाजाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर देवस्थान समितीने कारवाई करत काल (१३ जून) १६७ कर्मचाऱ्यांना कामावर काढून टाकले. दरम्यान, देवस्थान समितीच्या या निर्णयाचे प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय संत समिती, धर्म समाज, महंत डॉ.अनिकेतशास्त्री महाराज यांनी स्वागत केले आहे.
महंत डॉ. अनिकेतशास्त्री महाराज म्हणाले, शनी शिंगणापूर देवस्थानचे हार्दिक अभिनंदन करतो, कारण १०० हून अधिक अन्य धर्मीय कट्टरतावादी जे लोक होते, त्यांना नोकरीतून बहिष्कृत करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अखिल भारतीय संत समिती, धर्म समाजाकडून स्वागत करतो.
दरम्यान, भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्या इशाऱ्यानंतर मंदिर समितीने ही कारवाई केली. याबाबत माहिती देताना आचार्य तुषार भोसले म्हणाले, शनी शिंगणापूर देवस्थानात मुस्लीम कर्मचारी नियुक्त केल्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने १४ जून रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. पण या मोर्च्याचा दबाव इतका वाढला कि या मंदिर विश्वस्तांना झुकावे लागले. आणि त्यांनी जाहीर केले कि मुस्लीम कर्मचाऱ्यांना आम्ही काढून टाकतोय. हिंदू समाजाच्या एकजूटीचा हा विजय आहे. राज्यातील इतर देवस्थानांना आग्रह करतो कि अशा पद्धतीने हिंदू देवस्थानांमध्ये अन्य धर्मियांचे लाड खपवून घेतले जाणार नाहीत.
हे ही वाचा :
ब्लॅक बॉक्स डेटा डीकोड केला जातोय!
दारू घोटाळ्याच्या पैशातून उभारले काँग्रेस भवन? ईडीकडून जप्त!
विजय रुपाणी ७ दिवसांपूर्वीच लंडनला जाणार होते, मग १२ जूनची तारीख का निवडली?
मारक्रमच्या पराक्रमाने दक्षिण आफ्रिकेला पहिलं ICC विश्वविजेतेपद!
ते पुढे म्हणाले, देवस्थानामध्ये एकूण २४६४ कर्मचारी नियुक्त आहेत. त्यापैकी ११४ कर्मचारी मुस्लीम आहेत. मंदिर प्रशासनाने कारवाई करत मुस्लीम कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. या कारवाईवर मंदिर समितीचीही प्रतिक्रिया आली. मंदिर समितीला कामावर घेण्याचा आणि काढण्याचा अधिकार आहे. त्यानुसार सतत गैरहजर असणे, देवस्थानच्या नियमांचे पालन न केल्याने आणि इतर चुकांमुळे आज १६७ कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. मागील पाच वर्षांपूर्वी १०५ कर्मचाऱ्यांवर अशी कारवाई करत काढून टाकले होते, असे मंदिर समितीने म्हटले.
