32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांसाठी खजिना खुला

पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांसाठी खजिना खुला

Google News Follow

Related

कोरोनामुळे एकीकडे सर्वसामान्य जनता आर्थिक विवंचनेत असली तरी पालिकेला मात्र तशी कोणतीही चिंता सतावत नाही.  महापालिकेमधील राजकीय पदाधिकारी तसेच इतर अधिकारी यांच्यासाठी खजिना खुला केला आहे. सामान्य माणसांना रडतखडत एका ठिकाणाहून दुसरे ठिकाण गाठावे लागत आहे. पण पालिकेतील अधिकाऱ्यांच्या वेळेची खोटी होऊ नये, याची काळजी पालिकेने घेतली आहे. त्यासाठी २४ नव्याकोऱ्या गाड्या ताफ्यात जमा करण्यात येणार आहेत. पालिका याकरता तब्बल २ कोटी ७६ लाख ९९ हजारांचा खर्च करणार आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये या गाड्या पालिकेच्या ताफ्यात दाखलही होतील.

हे ही वाचा:

आंतरराष्ट्रीय कुबेर, वागळे आणि राऊत

आमिर खानच्या घटस्फोटानंतर ‘लव्ह जिहाद’ पुन्हा चर्चेत

धर्मांतरानंतर दहशतवादी बनलेल्या मुलीसाठी आईचे केंद्राकडे साकडे

आरोपी इमारतीवरून पडून मृत्युमुखी; स्थानिकांकडून पोलिसांना मारहाण

सध्या पालिकेच्या ताफ्यात गाड्या आहेत, परंतु त्यात बिघाड होत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. वारंवार या गाड्यांमध्ये बिघाड होत असल्याने पालिकेकडून नवीन गाड्या खरेदी करण्यात येत आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता २४ जुन्या गाड्या जाऊन नवीन गाड्या येणार आहेत. राजकीय पदाधिकारी यांनी तक्रारी करत नवीन गाड्यांची मागणी केली होती. त्यामुळेच आता पालिकेच्या जुन्या स्कॉर्पिओ गाड्या मोडीत निघणार आहेत. त्यांच्याजागी नवीन २४ महिंद्रा बीएस-६ या गाड्या दाखल होणार आहेत.

या गाड्या महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीकडून पालिका खरेदी करणार आहे. ई मार्केट प्लेस पोर्टलच्या माध्यमातून या गाड्या खरेदी केल्या जाणार असल्यामुळे त्या बाजारभावापेक्षा कमी किमतीला मिळतील, असे बोलले जात आहे. या एका गाडीची किंमत ११ लाख चार हजार ३५५ रुपये आहे. त्यामुळेच आता एकूण २४ गाड्या खरेदीवर विमा वगैरे सर्व खर्च समाविष्ट करून एकूण ५० ते ६० लाख रुपयापर्यंत खर्च अधिक वाढणार आहे. या गाड्यांचा विमा, त्यांची नोंदणी, आरटीओ कर याचा खर्चही पालिकेच्याच तिजोरीतून केला जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा