28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरविशेषपंजाब राजस्थानच्या सामन्यात बॉलर्सचा बोलबाला

पंजाब राजस्थानच्या सामन्यात बॉलर्सचा बोलबाला

Related

टी ट्वेन्टी क्रिकेट हा प्रकार त्यातील तुफान फटकेबाजीमुळे लोकप्रिय झाला आहे. पण कायमच उत्तम दर्जाची गोलंदाजी ही या प्रकारात एक निर्णायक भूमिका बजावत असते. आयपीएल २०१९ च्या ३२ व्या सामन्यात हेच पाहायला मिळाले. पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात राजस्थान संघाने अवघ्या दोन धावांनी पंजाबवर विजय मिळवला. अंतिम षटकातील अखेरच्या चेंडूपर्यंत चाललेल्या या रोमहर्षक सामन्यात दोन्ही संघांच्या गोलंदाजांचे योगदान हे खूपच महत्त्वाचे ठरले.

पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला राजस्थान संघाची सुरुवात बघता पंजाबचा निर्णय चुकीचा आहे की काय असे वाटू लागले होते. सलामीवीर लुईस आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनीही राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी अर्धशतकी भागीदारी रचली होती. पण नंतर लुईस ३६ धावांवर बाद झाल्याने ही भागीदारी मोडली गेली. यशस्वी जयस्वालही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असतानाच हरप्रीत ब्रारने त्याचा काटा काढला. त्याने ३६ चेंडूत ४९ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर महिपाल लाममोर याच्या तुफानी खेळीचा अपवाद वगळता. राजस्थानचा एकही खेळाडू चांगली कामगिरी करू शकला नाही. महिपाल अवघ्या १७ चेंडूत ४३ धावा केल्या. या तीन खेळाडूंच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर राजस्थान संघाने १८५ पर्यंत मजल मारली.

राजस्थानच्या या आव्हानाचा पाठलाग करायला मैदानात उतरलेले पंजाबचे सलामीवीर कर्णधार के.एल राहुल आणि मयंक अगरवाल यांनी नेहमीप्रमाणेच तुफान फटकेबाजी करत संघाला विजयाच्या मार्गावर नेऊन ठेवले होते. त्या दोघांनी १२० धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी रचली होती. ज्यामध्ये राहुल ने ४९ तर मयंक अग्रवाल ने ६७ धावा केल्या होत्या.

हे ही वाचा:

कोण होणार नवे हवाई दल प्रमुख?

हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द

नसीब फळफळले! तालिबानींमध्ये सापडला समज असलेला एकमेव माणूस

जस्टिन ट्रुडो यांनी पायावर धोंडा पाडून घेतला

त्यांच्यापाठोपाठ मैदानात खेळायला आलेले मरक्रम आणि निकोलस पूरन यांनीही चांगल्या धावा करत पंजाबला सुस्थितीत आणले होते. पण अखेरच्या दोन षटकात राजस्थानच्या गोलंदाजांनी बाजी पलटवली.

एकोणिसाव्या षटकात मुस्तफिजुर रहमान याने केवळ चार धावा दिल्या. तर अखेरच्या षटकात कार्तिक त्यागीने निकोलस पुरन आणि दीपक हूडा यांच्या दोन महत्त्वपूर्ण विकेट काढत राजस्थानला विजयी मुकुट घातला. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा