30 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरविशेषइम्रान खानच्या घरावर बुलडोझर

इम्रान खानच्या घरावर बुलडोझर

लाहोरमधील जमान पार्क येथील घरातील गेट तोडून आत प्रवेश

Google News Follow

Related

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. तोशाखाना प्रकरणी सुनावणीसाठी इस्लामाबाद कोर्टात जाताना इम्रान खान यांना टोलनाक्यावर अडवण्यात आले. टोलनाक्यावरून निघताच पोलिसांनी त्यांच्या लाहोरमधील जमान पार्क येथील घरातील गेट तोडून आत प्रवेश केला. यावेळी पोलिसांची आणि कार्यकर्त्यांशी झटापटही झाली. यावेळी कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही करण्यात आला.

 

यावेळी इम्रान खान यांनी ट्वीट केले, पोलिस माझ्या घरात घुसले आहेत. माझी पत्नी एकटी आहे. ही कारवाई कोणत्या कायद्यान्वये केली गेली, हे कळत नाही. हे सर्व नवाझ शरीफ यांनी घडवून आणले आहे.

इम्रान खान यांनी याआधीच आपल्या अटकेची शक्यता व्यक्त केली होती. यावेळी ते म्हणाले की, जर मला अटक झालीच तर पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्ष चालवण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. मात्र ही समितीत कोण चालवेल याची कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही.

हेही वाचा :

मराठी चित्रपटात महत्त्वाचे योगदान देणारे प्रसिद्ध अभिनेते भालचंद्र कुलकर्णी कालवश

अखेर लाल वादळ शमलं, शेतकरी मोर्चा स्थगित

खलिस्तानचा खरा शत्रू भारत नसून पाकिस्तान!

भास्कर जाधवांना राष्ट्रवादीचे वेध लागलेत का?

इम्रान खान यांच्या ताफ्याला अपघात

इस्लामाबादकडे जाताना इम्रानच्या ताफ्याच्या तीन गाड्यांना अपघात झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे म्हटले जातेय. वेग अधिक असल्याने हा अपघात झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अपघातानंतर इम्रान खान यांनी मला अटक करायची आहे. त्यामुळे मला रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत असेही म्हटले आहे. हा लंडन योजनेचा भाग असून, मला तुरुंगात टाकावे अशी नवाझ शरीफ यांची मागणी आहे. मी कोणतीही निवडणूक लढवावी असे नवाझ शरीफ यांना वाटत नाही. माझा कायद्यावर विश्वास असल्यामुळे मी कोर्टात हजर राहणार, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.

 

इस्लामाबादमध्ये कडक सुरक्षा, कलम १४४ लागू

सुरक्षेच्या कारणास्तव इस्लामाबादमध्ये एक हजार पोलिसांना तैनात केले आहे. न्यायालयीन आवारात कोणत्याही सुरक्षारक्षकाला शस्त्र बाळगण्याची परवानगी दिलेली नाही. न्यायालयात येणाऱ्या सर्वांची ओळखपत्रे तपासली जात आहेत. इम्रान खान सायंकाळी सहाच्या सुमारास लाहोर येथील उच्च न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने त्यांना नऊ प्रकरणामध्ये संरक्षात्मक जामीन मंजूर केला. इस्लामाबादेत सुरू असलेल्या खटल्यांसाठी त्यांना २४ मार्चपर्यंत जामीन मंजूर झाला. लाहोरमध्ये सुरू असलेल्या तीन खटल्यांसाठी त्यांना २७ मार्चपर्यंत जामीन मंजूर झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा