31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरविशेषसंभाजीनगर राड्यातील आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले

संभाजीनगर राड्यातील आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले

अटक करण्यासाठी पोलिसांची ८ पथके सज्ज

Google News Follow

Related

छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या दोन गटातील राड्यामुळे दगडफेक, पोलिसांच्या गाड्यांवर हल्ले, त्यांची जाळपोळ, त्यात बंदोबस्तावर असलेले पोलीस जखमी होण्याचे प्रकार यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. या सगळ्या प्रकाराचे अनेक सीसीटीव्ही फूटेज समोर आले असून त्या दंग्यात सामील असलेल्या पकडण्यासाठी पोलिसांच्या ८ टीम स्थापन करण्यात आल्या आहेत.

रामनवमीची तयारी सुरू असताना हा प्रकार आदल्या दिवशी रात्री घडला. या दरम्यान पोलिसांच्या वाहनांवर हल्ले केल्याचे सीसीटीव्हीत दिसते आहे. त्या गाड्यांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ले करून त्यांच्या काचा फोडण्यात येत असल्याचे सीसीटीव्हीत दिसते आहे. तर गाड्यांना आगीही लावण्यात आल्या. त्यावर जोरदार दगडफेकही केली जात असल्याचे दिसते. या घटनेनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली व वातावरणातील तणाव अद्याप कायम आहे.

रामनवमीचे आयोजन आता पोलिस बंदोबस्तात होत आहे. या सगळ्या दंगलसदृश परिस्थितीनंतर एफआयआर नोंदविले गेले आहेत. जवळपास ४००-५०० लोक यात गुंतले असल्याचे दिसते आहे. पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी ही एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

ब्रिटनच्या कोर्टातच खेचतो! ललित मोदींचा राहुल गांधींना इशारा

छत कोसळून ४० फूट खोल विहिरीत पडले, १३ जणांचा मृत्यू

शरियत कायदा हा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत

अमित शहा म्हणाले, मोदींना गोवण्यासाठी सीबीआय तेव्हा माझ्यावर दबाव आणत होती!

हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी ८ पथके तयार करण्यात आली असून अटक केली गेल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल, असेही गुप्ता म्हणाले आहेत.

यानिमित्ताने राजकारण करण्याची संधी विरोधी पक्षांनी साधली. विधान परिषदेतील ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गेल्या दीड महिन्यापासून हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यात एमआयएम, भाजपा आणि गद्दारांचा समावेश आहे. दंगल होणार असा अंदाज आधीपासूनच लावला जात होता.

संभाजीनगरच्या किराडपुरा भागात हा राडा झाला. श्रीरामाचे मंदिर या भागात आहे. तिथे रामनवमीची तयारी सुरू असताना हा दंगा झाला. त्यातून दगडफेक, जाळपोळीपर्यंत प्रकरण चिघळले. घोषणाबाजीही झाली. अनेक व्हीडिओ बाहेर येऊ लागले. त्यात आगी लागल्याचे दिसत होते. दगडफेक करणारे युवक दिसत होते. पोलिसांच्या गाड्यांसोबतच खासगी वाहनांनाही लक्ष्य करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसही तिथे दाखल झाले. गोळीबार करून दंगेखोरांना पांगविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला तसेच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. तेव्हा या दंगेखोरांनी अधिक आक्रमक रूप घेत पोलिसांवरच हल्ले केले.

या सगळ्या घटनेनंतर तिथे जाळलेल्या गाड्या, रस्त्यावर इतस्ततः विखुरलेले दगड, चपलांचा खच दिसला. या सगळ्या गोष्टी हटविण्यात आल्या. एसआरपीएफचा बंदोबस्त ठेवण्यात आला.

रामनवमी आणि रमझानच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागांना पोलिसांनी गराडा घातला आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्याचे सांगून आता सगळीकडे शांतता असल्याचे स्पष्टीकरण दिले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा