25 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरविशेषग्राऊंड स्टाफला विराटने दिला खास वेळ!

ग्राऊंड स्टाफला विराटने दिला खास वेळ!

शतकवीर विराटने सामना संपल्यानंतर घेतली भेट

Google News Follow

Related

क्रिकेट विश्वचषकाच्या कालच्या टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेला नमवत मजल मारली.विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावत क्रिकेटच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.तो म्हणजे सचिन तेंडुलकरच्या वनडेमध्ये सर्वाधिक शतकांच्या रेकॉर्डची बरोबरी करत कोहलीने ४९ वे शतक पूर्ण केले.भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचा काल वाढदिवस होता.भारताच्या विजयनानंतर विराट कोहलीने ईडन गार्डन्सवरील ग्राउंड स्टाफ साठी केलेल्या कृतीची सर्वत्र चर्चा होत आहे.याचा व्हिडिओ व्हायरल होत असून विराट कोहलीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना रविवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर पार पडला.भारतीय संघाने ३२६/५ अशी धावसंख्या उभारली.मात्र, दक्षिण आफ्रिकेने ८३ धावांवर आपली गाशा गुंडाळली.२४३ धावांनी विजय मिळवून भारताने आपले गुणतालिकेतील टॉपचे स्थान टिकवून ठेवले आहे. भारताचा हा सलग आठवा विजय होता.सामना पार पडल्यानंतर विराट कोहलीने ग्राउंड वरील स्टाफ सोबत फोटो सेशन केले.विराटचा या कृतीने क्रिकेट चाहत्यांची त्याने मने जिंकली.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून क्रिकेट चाहत्यांनी विराटवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.तसेच कालच्या सामन्यात विराट कोहलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

हे ही वाचा:

जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!

भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त

‘अतिमागास वर्गाला कमी लेखण्यासाठी बिहारच्या जातीय सर्वेक्षणात फेरफार’!

महादेव बेटिंग ऍपवर केंद्र सरकारची बंदी!

विराट कोहलीचा काल वाढदिवस झाला तो ३५ वर्षीय झाला.तो म्हणाला की, मी त्याच्या (तेंडुलकर) इतका चांगला कधीच असू शकत नाही पण माझ्या बालपणीच्या हिरोचा रेकॉर्ड गाठणे हा सुद्धा माझ्यासाठी सन्मान आहे मी त्याला टीव्हीवर बघायचो आणि मला माहित आहे मी कशातून पुढे आलो आहे. आजच्या रेकॉर्डनंतर तेंडुलकरने केलेले ट्वीट तर माझ्यासाठी अत्यंत खास आहे.

सामन्यासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे आभार मानत कोहली म्हणाला की, “आज आम्ही स्पर्धेतील सर्वात तगड्या संघाच्या विरुद्ध खेळत होतो. पण चांगलं खेळायचं याच एका उद्देशाने संघ खेळत होता. आज माझा वाढदिवस इथल्या लोकांनी खूप खास केला आहे. मी काहीतरी आहे याची जाणीव करून देणारा आजचा दिवस होता” असं म्हटल्यावर कोहलीने मैदानावर उपस्थित ग्राउंड स्टाफची भेट घेऊन त्यांच्यासह फोटो काढला. याच क्षणाचाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा