तामिळनाडू वक्फ बोर्डाने नुकतीच तिरुची येथील सब रजिस्ट्रारना पत्र पाठवून तिरुचेनदुराई येथील ४८० एकर इतकी जागा आमची आहे. त्यामुळे या गावातील कोणत्याही जमिनीचे व्यवहार करताना आम्हाला विचारल्याशिवाय ते करता येणार नाही.
वक्फ बोर्ड हे वैधानिक मंडळ असून वक्फ कायदा १९५४ अंतर्गत येते. त्यानुसार आता कोणत्याही जागेचा व्यवहार करण्यापूर्वी या वक्फ बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल. या गावातील चंद्रशेखर स्वामी मंदिर आणि त्यांची जमीनही वक्फ बोर्डाच्या अखत्यारित येणार आहे.
त्यावरून आता अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इस्लामचा जन्म १४०० वर्षांपूर्वी झाला आणि मुस्लिम धर्मियांच्या वक्फ बोर्डाने मात्र १५०० वर्षांपूर्वीच्या चंद्रशेखर स्वामी मंदिराची जमीन आपलीच असल्याचा दावा केला आहे, असे ट्विट करून एकाने या प्रकरणावर भाष्य केले आहे.
ही माहिती मिळाल्यानंतर या गावातील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेस ही बाब आणून दिली. या दाव्याविरोधात गावकऱ्यांनी आंदोलने करण्याचा इशारा दिला. वक्फ बोर्डाने हा निर्णय कसा काय घेतला, असा सवाल गावकऱ्यांनी विचारला आहे.
हे ही वाचा:
‘सांगलीत साधुंना झालेल्या मारहाणीत काॅंग्रेसचा सहभाग’
भारत-चीन सीमा भागात उभारणार ६०० नवीन गावे
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीत लव्ह जिहाद? दोन मुलींना बलात्कार करून ठार मारले
संजय शिरसाट भडकले; नाराजीच्या अफवा पसरवल्या तर
याबाबत श्रीरंगमचे विभागीय महसूल अधिकारी वैद्यनाथन यांनी प्राथमिक स्वरूपाची चौकशी केली आहे. शिवाय या प्रकरणात वाद मिटविण्याचाही प्रयत्न झाला आहे. त्यात हिंदू समाजातील संघटना, महसूल विभाग, नोंदणी विभाग, पोलिस असे सगळे सहभागी झाले होते. त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, तिरुचेनदुराई गावातील स्थिती सध्या आहे तशीच ठेवण्यात येईल. जमिनीच्या व्यवहारासंदर्भात कोणतेही पाऊल उचलले जाऊ नये.







