30 C
Mumbai
Thursday, October 24, 2024
घरविशेषकंगना रानौतला थप्पड मारणारी सीआयएसएफची जवान मागतेय माफी

कंगना रानौतला थप्पड मारणारी सीआयएसएफची जवान मागतेय माफी

सीआयएसएफचे वरिष्ठ अधिकारी विनय काजला यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि अभिनेत्री कंगना रानौत हिला चंदीगढ विमानतळावर एका सीआयएसएफच्या महिला कॉन्स्टेबलने थप्पड लगावली होती. यासंदर्भात त्या महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे शिवाय, तिच्या या कृतीनंतर एक समिती स्थापन करून चौकशी करण्यात येत आहे. अशातच आता थप्पड मारणारी सीआयएसएफ जवान आता माफी मागत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘नवभारत टाईम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

सीआयएसएफचे वरिष्ठ अधिकारी विनय काजला यांनी या प्रकरणावर बोलताना सांगितले की, या घटनेनंतर ते चंदीगड विमानतळावर पोहोचले होते. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. मोहाली पोलिसांनी कुलविंदर कौरविरुद्ध कलम ३२३ आणि ३४१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही कलमे जामीनाची आहेत. विनय काजला यांनी सुरक्षेत निष्काळजीपणा झाल्याचे मान्य केले असून तपास सुरू करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

जम्मू काश्मीरमध्ये आयएसआय, दहशतवाद्यांची कामे करत होते सरकारी कर्मचारी!

‘पवन कल्याण’ ठरले आंध्रच्या निवडणुकीतले वादळ

ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा ३६ धावांनी पराभव

महाराष्ट्रात भाजपला पराभूत करण्यासाठी मुस्लिमांची एकजूट

विनय काजला यांनी सांगितले की, “मी स्वतः कंगना रानौत यांना भेटलो आहे. या घटनेबद्दल कौर ही कंगनाची माफी मागत आहे.” कंगनाने विनय यांना विचारले की, कुलविंदरने तिला थप्पड मारण्याचा प्रयत्न का केला? कुलविंदर कौरला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यावर त्यांनी सांगितले की, त्यांच्याविरुद्ध तपास सुरू आहे. औपचारिक तक्रार दाखल केली आहे. कंगनाला थप्पड मारल्यानंतर महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर म्हणाली होती की, ती शेतकऱ्यांच्या विरोधावर नाराज आहे. ही नोकरी गमावण्याची भीती वाटत नाही. माझ्या आईच्या सन्मानासाठी मी अशा हजारो नोकऱ्या गमावण्यास तयार आहे, असे तिने म्हटले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
184,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा