जगभरात १६ सप्टेंबर २०२३ हा दिवस जागतिक स्वच्छता दिवस साजरा केला जातो, यानिमित्ताने ‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ संस्थेने ‘गो शोन्या’, ‘सक्षम ग्रुप’, ‘मॅग्रोव्ह फौंडेशन’ यांच्या संयुक्तविद्यमाने मिरा भाईंदर शहरातील उत्तन समुद्रकिनारी भव्य स्वच्छता मोहिम व प्रत्यक्षात किनाऱ्यावरील प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा उपक्रम सुद्धा राबविण्यात आला.
महाराष्ट्र वन विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, डेकॅथलॉन, CO2 Exist यांचे विशेष सहकार्य होते. मिरा भाईंदर येथील उत्तन समुद्रकिनारी राबविण्यात आलेल्या या भव्य स्वच्छता अभियानात ६६०० हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेत ४६ टन हून अधिक इतका कचरा काढला.
हे ही वाचा:
धुळ्याचे माजी नगरसेवक किरण अहिरराव यांचे कार अपघातात निधन !
हिप हिप हूपर्स हुर्रे…बास्केटबॉल स्पर्धेचे पटकावले जेतेपद
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
भव्यदिव्य प्रदर्शन, परिषदांसाठी ‘यशोभूमी’ केंद्र खुले
विशेष म्हणजे किनाऱ्यावरील कचरा गोळा करताना प्रत्येक स्वयंसेवकांना प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर कसा केला जातो याचे प्रत्यक्षात धडे देण्यात आले. प्रत्येक स्वयंसेवकाने स्वतः आणलेल्या कचऱ्यापासून लाइव्ह रिसायकलिंग काउंटरवर सुमारे १००० हून अधिक स्वयंसेवकांना की चेन ( key Chain -चावी अडकविण्यायसाठी वापरण्यात येणारी साखळी ) देण्यात आली. ५०० किलो प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्यात यश मिळाले.
या समुद्रकिनारा स्वच्छता अभियान व प्लास्टिक कचऱ्याचे पुनर्वापर मोहिमेत परिक्षेत्र वन अधिकारी विक्रांत खाडे, महानगपालिकेचे उपायुक्त रवि पवार, माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, गो शोन्या चे गोपाळ, फ़ॉर फ़्यूचर इंडिया संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष हर्षद ढगे, मिरा भाईंदर महानगपालिकेचे स्वच्छता निरीक्षक अरविंद चाळके, यांच्यासोबत सक्षम ग्रुपचे पदाधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र वन विभाग व मॅग्रोव्ह फौंडेशनचे अधिकारी, डेकॅथलॉन कर्मचारी वर्ग, मिरा भाईंदर महानगपालिकेचे स्वच्छता कर्मचारी वर्ग, राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत ६० कॉलेजमधील शिक्षक व विद्यार्थी, स्थानिक परिसरातून ८ शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.