31 C
Mumbai
Saturday, March 28, 2026
घरविशेष'बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो'

‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली भावना

Google News Follow

Related

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील चैत्यभूमीला जाऊन आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, आज आपण केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच जगामध्ये ताठ मानेने उभे आहोत. आंबेडकर यांच्या घटनेमुळे सर्वसामान्यांना अधिकार प्राप्त झाले आणि जगण्याचा हक्क मिळाला. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर जाऊ शकला. राज्यातही माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकली. मला राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली. हे केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झाले. मी बाबासाहेबांचा शतश: ऋणी आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

तसेच इंदू मिल येथील आंबेडकर यांच्या भव्यदिव्य स्मारकार लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. या स्मारकाच्या कामाचा आम्ही आढावा घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. मी मुख्यमंत्री झालो त्यानंतर मी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. बाबासाहेबांनी जो विचार दिला, जो मार्ग दाखवला त्यावरच आमचे सरकार चालेल असा मी निर्धार केला असल्याचे शिंदे म्हणाले.

हे ही वाचा : 

पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका

एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला

संघाला विरोध मग पीएफआयच्या पाठीशी का?

महाविकास आघाडीचा नवा ‘उद्योग’; १७ डिसेंबरला सरकारविरोधात मोर्चा

लोअर परेल येथील स्मारकाच्या कामाचीही पाहणी केली जाणार आहे. आंबेडकर यांच्या आठवणी जपण्याचे काम केले जाईल. आर्थिक, सामाजिक लोकशाही नसेल तर राजकीय लोकशाही यशस्वी होणार नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा