22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
घरविशेषकोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत; रस्त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत; रस्त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत एका लेनचे उद्घाटन

Google News Follow

Related

मुंबईकरांची कोस्टल रोड खुला होण्याची प्रतीक्षा अखेर संपली असून गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असणारा मुंबई कोस्टल रोड अखेर मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सोमवार, ११ मार्च रोजी या कोस्टल रोडचे लोकार्पण करण्यात आले. हा कोस्टल रोड छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणार असल्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबईत प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतच्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या टप्प्यावरील एका लेनचं उद्घाटन करण्यात आलं आहे. लोकार्पण झाल्यानंतर बेस्टच्या इलेक्ट्रिक डबल डेकर बस, विंटेज गाड्यांनी या कोस्टल रोडवरून फेरी मारली. यावेळी कोळी महिला आपल्या पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होत्या.

मुंबईकरांना कोस्टल रोडच्या या मार्गिकेवरुन मंगळवारपासून प्रवास करता येणार आहे. पण, सध्या आठवड्यातील पाच दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ही मार्गिका खुली असणार आहे. तर, शनिवार आणि रविवारी या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यात वरळीपासून ते मरीन ड्राइव्हच्या दिशेनं जाणारी मार्गिका खुली करण्यात आली आहे. या मार्गिकेमुळे पाऊण तासाचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत करणं शक्य होणार आहे. ‘कोस्टल रोड’मुळे लाखो मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा:

‘आयुष्मान’ योजनेचा ४८ टक्के महिलांकडून लाभ!

‘त्यासाठी आधी अश्विन, जडेजाशी बोलावे लागेल’

सात्विक-चिराग जोडीची दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन चॅम्पियन्सला गवसणी!

अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रॅव्हल बसवर गोळीबार

एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे. संपूर्ण रस्ता टोलमुक्त असणार असल्याची घोषणा याआधीच करण्यात आली होती. मुंबईच्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोस्टल रोड महत्त्वाचा ठरणार आहे. यामध्ये नरीमन पॉइंट ते वर्सोवा हा पहिला टप्पा, वरळी ते वांद्रे हा दुसरा टप्पा तर विरारपर्यंतचा विस्तार हा तिसरा टप्पा असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा