भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ विनोदी कलाकार सतीश शाह यांचे निधन झाले आहे. अचूक कॉमिक टायमिंगसाठी त्यांची विशेष ओळख होती. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्याच्या जाण्याने भारतीय चित्रपट सृष्टी आणि दूरदर्शन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त होत आहे.
शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सतीश शाह यांच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी झाली असून त्यांच्या पार्थिवावर उद्या (२६ ऑक्टोबर) रोजी अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी माहिती आहे. सतीश हे बऱ्याच काळापासून किडनीच्या संबंधित आजाराने ग्रस्त होते. तसेच त्यांची किडनी प्रत्यारोपण झाल्याचं बोललं जातं होते. त्यातूनच त्यांना इन्फेक्शन झाले होते. त्यांना दादरमधील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा..
सिडनीमध्ये रोहित- विराटची फटकेबाजी; भारताचा नऊ विकेट्सने दणदणीत विजय
अलीगढमध्ये पाच मंदिरांवर लिहिले “आय लव्ह मोहम्मद”
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या अकील खानला अटक
निवडणुकीपूर्वी मोतिहारीत शस्त्र साठा सापडला
सतीश शाह यांचा जन्म २५ जून १९५१ रोजी मुंबईत झाला. १९७२ मध्ये त्यांनी डिझायनर मधू शाह यांच्याशी लग्न केले. १९८४ मध्ये आलेल्या कुंदन शाह आणि मंजुल सिन्हा दिग्दर्शित ‘ये जो है जिंदगी’ या सिटकॉम मालिकेत त्यांनी छोटीशी भूमिका साकारली. त्यांनी ५५ भागांमध्ये काम केले, प्रत्येक भागात त्यांची भूमिका वेगळी होती. अशाप्रकारे, त्यांनी एकाच मालिकेत ५५ पात्रे साकारली. साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत त्यांनी इंद्रवर्धन साराभाईची भूमिका साकारली होती, त्यामुळे ते घराघरात लोकप्रिय झाले. १९९५ मध्ये झी टीव्हीवरील ‘फिल्मी चक्कर’ या मालिकेत त्यांनी रत्ना शाह पाठक यांच्यासोबत काम केले होते. सतीश शाह यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास १९८० च्या दशकात सुरू झाला. मैं हूँ ना, कल हो ना हो, फना, वीराना, ओम शांती ओम यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही लक्षात आहेत.







