29.5 C
Mumbai
Tuesday, May 20, 2025
घरविशेष‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये काँग्रेसला धर्म दिसतोय

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये काँग्रेसला धर्म दिसतोय

Google News Follow

Related

काँग्रेस नेते उदित राज यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावावर घेतलेल्या आक्षेपावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी उदित राज यांच्या विधानावर प्रश्न उपस्थित करताना ते सशस्त्र दलांचं मनोबल कमी करणारं असल्याचं म्हटलं आहे. भाजप प्रवक्ते पूनावाला यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, “काँग्रेस पक्ष नेहमीच मतपेढीच्या राजकारणाला राष्ट्रीय हितापेक्षा वर मानतो. यापूर्वी चन्नी यांनी सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित केले होते, सबळ पुरावे मागितले होते. अजय राय यांनी खेळण्याच्या विमानाचा दाखला देऊन वायुदल आणि राफेल विमानांची खिल्ली उडवली होती. काँग्रेस नेत्यांकडून सशस्त्र दलांचं मनोबल कमी करणारी विधानं सातत्याने केली जात आहेत.”

ते पुढे म्हणाले, “‘ऑपरेशन सिंदूर’नंतर नऊ दहशतवादी तळं उद्ध्वस्त करत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. अशा वेळी काँग्रेस नेते उदित राज म्हणतात की ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव धर्मनिरपेक्ष नाही, ते एका विशिष्ट धर्माशी संबंधित आहे. पण हेच नेते त्या दहशतवाद्यांचा धर्म पाहत नाहीत, जे स्वतः धर्माच्या आधारे लोकांना लक्ष्य करत होते. काँग्रेसच्या नेत्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये धर्म दिसतोय, पण सैन्याचं मनोबल खच्ची करणे ही काँग्रेसची नेहमीची रणनीती झाली आहे.”

हेही वाचा..

लाहोर स्फोटांनी हादरले! सायरन वाजताच नागरिकांची पळापळ

केजरीवाल विरोधातील एका प्रकरणात कोर्टाने माहिती मागवली

‘डुप्लीकेट’ चित्रपटाला २७ वर्षे पूर्ण

‘तन्वी द ग्रेट’ मध्ये जॅकी श्रॉफची एंट्री

याआधी उदित राज यांनी एका चर्चेत सांगितले होते की विद्वानांच्या चर्चेतून हे समोर आलं की ‘सिंदूर’ हा शब्द विशिष्ट धर्माशी संबंधित आहे, आणि दुसरं कोणतंही नाव निवडलं गेलं असतं तर अधिक योग्य ठरलं असतं. मात्र, त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केलं की हे फारसं महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं हे आहे की पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत म्हटलं होतं की सरकार याचा भावनिक लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
249,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा