पश्चिम बंगालमधील कूचबिहारचे पोलिस अधीक्षक (SP) द्युतिमान भट्टाचार्य यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात दिवाळीच्या रात्री फटाके फोडणाऱ्या नागरिकांना, महिलांना आणि मुलांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात तीव्र संताप आणि निषेध व्यक्त करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर २०२५ च्या रात्री पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानाजवळ काही लोक फटाके फोडत होते. त्यावेळी भट्टाचार्य यांनी स्वतः हातात दांडुका घेऊन लोकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनीही हा मुद्दा उचलला होता.
तथापि, पोलिस अधीक्षक द्युतिमान भट्टाचार्य यांनी मारहाणीचे आरोप फेटाळून लावले. त्यांनी माध्यमांना सांगितले की, रात्री उशिरापर्यंत फटाके फोडले जात होते, त्यामुळे त्यांचे कुत्रे घाबरून भुंकत होते. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणी ऐकले नाही. त्यांनी मान्य केले की काही लोकांना अटक करण्यात आली, परंतु मारहाण झाल्याचे नाकारले.
हे ही वाचा :
भाऊबीजेनंतर मुंबईत थरार; तरुणीवर भररस्त्यात वार, तरुणाचीही आत्महत्या
‘ब्रेन डेड’ दिवाळी पोस्टला पाठिंबा दिल्याबद्दल महुआ मोइत्रा ट्रोल!
अमेरिकेच्या निर्बंधांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही!
इसिस मॉड्यूलच्या दोन दहशतवाद्यांना अटक
या वादानंतर, २३ ऑक्टोबर रोजी द्युतिमान भट्टाचार्य यांची बदली करून त्यांची नेमणूक राज्य सशस्त्र पोलिसांच्या तिसऱ्या तुकडीचे कमांडंट म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संदीप कर्रा यांची कूचबिहारचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.