भाऊबीजेच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईकरांना हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना लालबाग–काळाचौकी परिसरात घडली आहे. चिंचपोकळी येथील दत्ताराम लाड मार्गावर शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने भररस्त्यात एका तरुणीवर चाकूने बेदम हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी तरुणी जवळच्या नर्सिंग होममध्ये पळत गेली, मात्र हल्लेखोर तरुणाने तिचा पाठलाग करून तिथेही तिच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि त्यानंतर स्वतःचा गळा चिरून घेतला.
या थरारक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्याने स्वतःलाच गंभीर जखमी केले होते. नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवत दोघांनाही परळच्या केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिस आणि परिमंडळ ४ च्या उपायुक्त आर. रागसुधा यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचे एक पथक केईएम रुग्णालयात जाऊन पुढील तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा :
‘ब्रेन डेड’ दिवाळी पोस्टला पाठिंबा दिल्याबद्दल महुआ मोइत्रा ट्रोल!
अमेरिकेच्या निर्बंधांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही!
भारतानंतर अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार!
काळाचौकी पोलिसांनी गुन्ह्यात वाढ केली असून भारतीय न्याय संहिता कलम १०३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला प्रेमसंबंधातील वादातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.







