29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरविशेषकोवॅक्सिन लस डेल्टा, बीटा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी

कोवॅक्सिन लस डेल्टा, बीटा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी

Google News Follow

Related

हैदराबादच्या भारत बायोटेकची लस कोवॅक्सिन ही भारतात सापडणाऱ्या डेल्टा व्हेरिएंट आणि बीटा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेकने एका संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे.

डेल्टा व्हेरिएंट हा भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार आहे. त्यामुळे भारतात कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. तर बीटा व्हेरिएंट हा पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत सापडला होता.

या तीन संस्थांनी केलेला अभ्यास अद्याप प्रकाशित करण्यात आला नाही. या अभ्यासासाठी कोरोनातून बरे झालेले २० रुग्ण आणि दोन्ही डोस घेऊन २८ दिवस झालेले १७ लोकांच्या सँपल घेण्यात आले होते. कोवॅक्सिनची ही लस या दोन व्हेरिएंटविरोधात अधिक प्रभावी असल्याचा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचं नामकरण केलं आहे. भारतात सापडलेला बी.१.६१७.१ हा कोरोना व्हेरिएंट ‘कप्पा’ आणि बी.१.६१७.२ हा व्हेरिएंट आता ‘डेल्टा’ या नावाने ओळखला जाणार आहे. हे दोन व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या ४४ हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झाला आहे.

यामध्ये डेल्टा हे व्हेरिएंट कप्पाच्या तुलनेत आणि जगातील इतर व्हेरिएंटच्या तुलनेत ५० टक्के जास्त वेगाने पसरत असल्याचं समोर आलं आहे. भारतातील दुसऱ्या लाटेला प्रामुख्याने डेल्टा हा व्हेरिएंट जबाबदार आहे. त्यामुळे मृतांची सख्या मोठ्या प्रमाणात वाढली. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात हा व्हेरिएंट सापडला असून दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगनामध्ये याचे प्रमाण जास्त आहे.

हे ही वाचा:

मराठा मोर्चापूर्वी १५ जूनला ओबीसी मोर्चा

वारकऱ्यांच्या ‘बायो-बबल’ पर्यायाचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडे करणार

मुळशीमधील कंपन्यांत घुसून पाहणी करु

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या केसेस लाखापेक्षा कमी

जागतिक आरोग्य संघटनेनं भारतात सापडलेला कोरोना डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक धोकादायक असून तो एक चिंतेचा विषय असल्याचं सांगितलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा