29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषमुळशीमधील कंपन्यांत घुसून पाहणी करु

मुळशीमधील कंपन्यांत घुसून पाहणी करु

Google News Follow

Related

पुण्याच्या मुळशी येथील उरवडे औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली. उरवड्यातल्या क्लोरिफाईड कंपनीत लागलेल्या आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या कंपनीत ही आग लागली. मंगळवारी घटनास्थळी प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी यांनी भेट दिली. यावेळी तरडे चांगलेच संतापले होते. आपले भाऊ बहिण कुठे आणि कशा अवस्थेत काय करतात, याची पाहणी आणि चौकशी आपण केलीच पाहिजे. मुळशी तालुक्याची रग दाखवून देऊ, कंपन्यांत घुसून पाहणी करु, अशा शब्दात तरडे यांनी आपला संताप व्यक्त केला.

प्रवीण तरडे हे मूळचे मुळशीचेच, ते तिथले भूमीपूत्र, वयाच्या विसाव्या बावीसाव्या वर्षी त्यांनी काही वर्षे तेथील कंपन्यांत काम केलंय. त्यांना तेथील परिस्थितीची जाणीव आहे. हीच गोष्ट त्यांनी मंगळवारी बोलून दाखवली. मी इथल्याच शेजारच्याच कंपनीत जवळपास दोन ते तीन वर्ष काम केलंय. मला इथली परिस्थिती माहिती आहे. आपले आय-बाप, बहीण भाऊ असेच महिन्या-वर्षांनी जळणार, आणि आपण हाच तमाशा पाहत बसायचं का? असा सवाल त्यांनी विचारला.

मी इथल्या सगळ्या सरपंच आणि उपसरपंच यांना विनंती करतो की आता आपले भाऊ बहीण- आई बाप, आपले नातलग जिथं कुठे काम करत अशतील तिथे आपण जाऊ, त्यांना विनंती करु, की आमची जवळची माणसं कुठं काम करतात, हे आम्हाला पाहू द्या. त्यांनी नाही ऐकलं तर आपण कंपन्यांत घुसू, पण ते कुठल्या परिस्थितीत काम करतात, हे आपल्याला पहावंच लागेल, नाहीतर वर्षानुवर्षे आणि महिन्यांनोमहिने असा तमाशा बघण्याची आपल्यावर वेळ येईल.

हे ही वाचा:

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या केसेस लाखापेक्षा कमी

फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या श्रीमुखात

आला रे आला…मुंबईत मुसळधार

मुंबईत गुन्हेगारीचा आलेख वाढला

४० बाय ४० मध्ये ३८ माणसं कशी काय काम करतात? म्हणजे २० माणसं वाचली यात आनंद मानायचा की दुर्दैव? ४० बाय ४० च्या ठोकळ्यात १०-१२ केमिकलच्या मशीन्स आहेत आणि ३८ माणसं कामाला, हे कसं शक्य आहे, असे संताप आणणारे आणि चीड आणणारे सवाल प्रवीण तरडे यांनी विचारले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा