29 C
Mumbai
Thursday, June 17, 2021
घर क्राईमनामा मुंबईत गुन्हेगारीचा आलेख वाढला

मुंबईत गुन्हेगारीचा आलेख वाढला

Related

गेल्या काही महिन्यांत मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेलेला आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांनंतर मुंबई पोलिस दलातील सचिन वाझेसह काही अधिकारी बडतर्फ झालेच, पण आता मुंबईतील गुन्हेगारीचा आलेखही वाढू लागला आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसते आहे. २०२०मधील गुन्हेगारीचा आलेख पाहिला तर यावर्षी गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. पोलिसांना त्यामुळे आपली प्रतिमा सुधारण्यासाठी या वाढत्या गुन्हेगारीकडे गांभीर्याने पाहावे लागणार आहे.हत्या, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, बलात्कार, घरफोडी, वाहनचोरी असे सर्वच गुन्हे वाढले आहेत.

हे ही वाचा:

पाकीटमारांना सापडले हिरे, पण हाती पडल्या बेड्या… कशामुळे?

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ

दहावी मूल्यांकन लांबणार; निकाल जुलैला

मुख्यमंत्री लायक असते तर इथं येण्याची गरज नव्हती

२०२१मध्ये कोरोनाचे निर्बंध असूनही गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाझेची अटक झाल्यानंतर पोलिस दलात बदल्यांचे प्रमाण वाढले. शिवाय, पोलिस दलावर झालेल्या आरोपांमुळे त्यांचे मनोबलही ढासळले. स्वाभाविकच गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले.

२०२०मध्ये हत्यांची संख्या ४७ होती ती यंदा ५० झाली आहे. जबरी चोरीतही वाढ झाली असून २३७ चोऱ्या गेल्या वर्षी होत्या त्या यंदा २४६ झाल्या आहेत. वाहनचोरीत तर मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या ७२५ होती ती यावर्षी १०९८ झाली आहे. जानेवारीत वाहनचोरीच्या ३२५ घटना होत्या तर मार्चमध्ये ती संख्या ३२९ होती. मारहाण प्रकरणांची संख्या या दोन वर्षांत अनुक्रमे १२१४ आणि १४५५ आहे. मार्च महिन्यांत मारहाणीच्या ४३५ घटना घडल्या आहेत. घरफोडीच्या घटनांत मात्र एप्रिलमध्ये घट झाली आहे. पण जानेवारीत त्या १७६ होत्या. बलात्काराच्या घटनात सातत्य दिसते आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत अनुक्रमे ७५, ७३, ७०, ६६ अशा घटना घडल्या आहेत.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,090सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा