30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरविशेषदलाई लामांचा ८६ वा वाढदिवस यामुळे झाला खास

दलाई लामांचा ८६ वा वाढदिवस यामुळे झाला खास

Google News Follow

Related

१४ वे दलाई लामा तेनजिन ग्यात्सो यांचा जन्म ६ जुलै १९३५ रोजी ईशान्य तिबेटच्या ताकस्तेर भागात झाला. आज त्यांचा ८६ वा वाढदिवस आहे. दलाई लामा ६ दशकांपासून भारतात राहत आहेत आणि स्वत: ला भारताचा मुलगा मानतात. त्याच बरोबर, त्यांचा वाढदिवस हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील तिबेटी समुदायासाठी दरवर्षी सर्वात मोठा कार्यक्रम ठरला आहे. यावेळी कोविड-१९ मुळे मॅकलॉडगंज धर्मशाळेत त्सुगलगखांग येथे महोत्सवाचे आयोजन केले जाणार नाही. तसेच, केंद्रीय तिबेट प्रशासनाने गाईडलाईन्स काढल्या असून सभा आयोजित करू नका असे सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीटच्या माध्यमातून दलाई लामा यांना वाढदिवशी शुभेच्छा दिल्या असून त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हिमाचल प्रदेश सरकारने सामाजिक मेळाव्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि एसओपी जारी केले आहेत. ज्यात ५० लोकांपर्यंतची मर्यादा घालण्यात आली आहे. यासह, जनतेला गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. खरं तर, तिबेटी लोकांसाठी, दलाई लामा ही चेनरेझिगची मानवी अभिव्यक्ती आहे. दरवर्षी हा दिवस भव्यता, वैभव आणि उत्सवाच्या भावनेने साजरा केला जातो. यावर्षी देखील हा दिवस त्याच उत्साहाने साजरा केला जाईल. मात्र, कोविडच्या नियमांकडेही दुर्लक्ष केले जाणार नाही.

हे ही वाचा:

ट्विटरला आता उच्च न्यायालयानेही झापले

थकबाकी भरा मगच परवाने मिळतील

‘शिवीगाळ’-‘निलंबन’ ‘नाट्या’नंतर भास्कर जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

तुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नाव हवं

दलाई लामा यांचा वाढदिवस हा तिबेटी समुदायाच्या भव्य कार्यक्रमांपैकी एक आहे. या दिवशी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केंद्रीय तिबेट प्रशासन, केंद्रीय सरकाराचे निर्वासित अधिकारी, हिमाचल प्रदेश सरकारचे अधिकारी, भारत सरकारचे प्रतिनिधी आणि विविध नामांकित जागतिक व्यक्ती उपस्थित असत. त्याचवेळी, दरवर्षी दलाई लामा यांच्या वाढदिवशी हिमालय, लडाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेशातील लोकं नृत्य, गाणी सादर करायचे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा