34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरविशेषजेजुरीच्या खंडोबा मंदिरात उधळली जाणारी हळद 'सेंद्रिय' असावी!

जेजुरीच्या खंडोबा मंदिरात उधळली जाणारी हळद ‘सेंद्रिय’ असावी!

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी जेजुरी देवस्थानचा आढावा घेतला

Google News Follow

Related

जेजुरी येथील ‘मार्तंड देवसंस्थान’ मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणगीचा हिशोब योग्य पद्धतींने ठेवण्यासाठी नवीन पावती पुस्तक छापून घ्यावीत.तसेच देवस्थानासह परिसरात हळद- कुंकू दिले जाते त्यामध्ये नैसर्गिक हळदीचा वापर व्हावा, या साठी शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने तेथील हळदीची तपासणी करावी व मगच ती वापरत आणावी असे निर्देश देण्यात आले आहेत. मंदिराच्या विकासाबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देवस्थान समितीला दिले आदेश.

 

जेजुरीचे खंडोबाचे मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रपैकी एक आहे. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील जेजुरी गावात एका डोंगरावर आहे. या मंदिराला जेजुरी गड, खंडोबाची जेजुरी असे सुद्धा म्हणतात. हे मंदिर काळया पाषाणापासून बनलेले पुरातन मंदिर आहे.

 

या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना जवळ जवळ २०० पायऱ्या चढून जावं लागत. चंपाषष्ठी उत्सवाला भाविकांची येथे प्रचंड गर्दी असते. येथे भाविक हळद- नारळ यांचा भंडारा हवेत आणि देवावर उधळतात.भाविक मंदिराच्या परिसरात जी हळद उधळतात ती नैसर्गिक असावी जेणेकरून भंडारा भाविकांच्या नाका तोंडात गेल्यामुळे कोणतीही इजा होऊ नये म्हणून मंदिराच्या परिसरात सेंद्रिय हळद वापरण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मार्तंड देवसंस्थान समितीला आदेश दिले.

 

हे ही वाचा:

महिला सुरक्षेबाबत स्वत:च्याच सरकारवर प्रश्नचिन्ह; राजस्थानच्या मंत्र्याची हकालपट्टी

इर्शाळवाडी दुर्घटना: मृतांची संख्या २२ वर, शोधकार्य सुरू

देशातील सर्वात श्रीमंत आमदार कर्नाटकातील काँग्रेस नेते शिवकुमार

पश्चिम बंगालमध्येही भाजप उमेदवाराची नग्न धिंड काढली होती, त्याचे काय?

शुक्रवार २१ जुलै रोजी विधानभवनात सन्माननीय सदस्य नरेंद्र दराडे यांनी विनंती अर्ज समितीकडे पुणे जिल्ह्यातील मार्तंड देवसंस्थान, जेजुरी या देवस्थानामधील गैरकारभराबाबतच्या विषयासंदर्भात केलेल्या अर्जावर बैठक घेण्यात आली.यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, जेजुरी देवस्थान येथील भाविकांना VIP पास दिल्यानंतर भाविकांना अधिकृत पावती द्यावी जेणेकरून देवस्थान कामकाजात पारदर्शकता येईल. मंदिरामध्ये देण्यात येणाऱ्या प्रसादाची तपासणी वेळोवेळी केली पाहिजे. नवीन पावती पुस्तके १५ ऑगस्ट पर्यंत छापून घेण्यात यावीत याची अंमलबजावणी तहसीलदार यांनी करावी असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

 

विधानपरिषद सदस्य दराडे यांनी, देवस्थानच्या ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती कोणा मार्फत झाली याची माहिती घेतली. तसेच नैसर्गिक हळदीच्या वापरावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. गावातला पैसा गावातच कसा राहील यादृष्टीने नियोजन करण्याचे, दराडे यांनी सांगितले. आमदार संजय जगताप यांनी देवस्थान करिता प्रशासकीय स्तरावर कामकाजात मदत करण्यासाठी स्वतंत्र नायब तहसीलदार स्तरावरील अधिकारी नेमण्याची विनंती केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा