पंजाबमधील अमृतसरमध्ये बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हातोडा मारल्याची घटना समोर आली आहे. यासह पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाची प्रतिकृती सुद्धा जाळण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. घटनेनंतर एफआयआर नोंदवत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज (२७ जानेवारी) अमृतसर बंद ठेवण्यात आले आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी दलित समाजाकडून करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून भाजपाने आपवर जोरदार टीका केली आहे.
पुतळ्याची विटंबना आणि संविधान जाळण्याच्या घटनेनंतर फगवाडा येथील दलित समाजात संतापाची लाट पसरली आहे. समाजाच्या लोकांनी फगवाडा हायवेवर आंदोलन करून रास्ता रोको केला. धरणाची माहिती मिळताच एसपी रुपिंदर कौर भाटी घटनास्थळी पोहोचत लोकांना शांत केले, त्यांची समजूत काढून कारवाईचे आश्वासन दिले.
भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर करत दलित समाजाच्या या अपमानाला अरविंद केजरीवाल जबाबदार असल्याचे म्हटले आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर न करणाऱ्या सरकारकडून दलित समाजाच्या कल्याणाची अपेक्षा कशी करता येईल?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा :
छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा ‘लेझीम’ प्रकार मोठा नाही!
महाकुंभमध्ये आलेले तरुण भाविक म्हणतात, पवित्र स्नान केल्यानंतर शांत वाटले
‘मुडा’ जमीन घोटाळा प्रकरणाचा अहवाल लोकायुक्तांकडून उच्च न्यायालयात सादर
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांची चीनला भेट
अमित मालवीय यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये घटनेतील आरोपी बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हातोड्याने मारहाण करताना दिसत आहे. तसेच संविधांची प्रतिकृती जळताना दिसत आहे. ते म्हणाले, एकीकडे देशभरात बाबा साहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहिली जात आहे आणि भारतीय संविधानाचे आदराने स्मरण केले जात आहे, तर दुसरीकडे पंजाबमधील अमृतसरमध्ये एका व्यक्तीने बाबा साहेब आंबेडकरांच्या ३० फूट उंच पुतळ्याला हातोड्याने नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ही घटना पंजाबमध्ये घडली आहे, जिथे आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेत आहे, जे स्वतःला बाबा साहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचे समर्थक म्हणवते. दलित समुदायाच्या या अपमानासाठी अरविंद केजरीवाल जबाबदार आहेत. जे सरकार बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करू शकत नाही, त्यांच्याकडून दलित समाजाच्या कल्याणाची अपेक्षा कशी करावी?
ते पुढे म्हणाले, दिल्लीतही अरविंद केजरीवाल यांनी गेल्या १० वर्षांत दलित समुदायाचे शोषण केले आहे. त्यांचा वापर फक्त मतपेढी म्हणून केला गेला पण त्यांच्या सन्मान आणि हक्कांसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. याचे उत्तर येत्या ५ फेब्रुवारी रोजी मिळेल, असे अमित मालवीय यांनी म्हटले.
एक तरफ पूरे देश में बाबा साहब अंबेडकर को श्रद्धांजलि दी जा रही है और भारतीय संविधान को सम्मानपूर्वक याद किया जा रहा है, वहीं पंजाब के अमृतसर में एक व्यक्ति ने बाबा साहब अंबेडकर की 30 फीट ऊंची प्रतिमा को हथौड़े से क्षतिग्रस्त करने की कोशिश की।
चौंकाने वाली बात यह है कि यह घटना उस… pic.twitter.com/sUWMvwFxhQ
— Amit Malviya (@amitmalviya) January 26, 2025







