महाकुंभ २०२५ साठी करोडोंच्या संख्येने लोक प्रयागराज येथे दाखल होत असताना देश विदेशातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. महाकुंभ मेळाव्यामध्ये सर्वच वयोगटाचे भाविक उपस्थित राहत असून त्रिवेणी संगम येथे स्नान करत आहेत. अशाच काही तरुण भाविकांनी त्रिवेणी संगम येथे डुबकी घेतल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आध्यात्मिक वातावरणात येताच या तरुण भाविकांना आनंद, शांती आणि ज्ञानाची अनुभूती झाल्याची भावना या तरुण भाविकांनी व्यक्त केली आहे.
चंदीगडमधील बिनिका ठाकूर या तरुणीने महाकुंभ मेळाव्यात येऊन त्रिवेणी संगम येथे स्नान केले. बिनिका ही आपल्या कुटुंबीयांसोबत सोमवारी पहाटेचे प्रयागराजला पोहोचली होती. तिने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, सुरुवातीला कडाक्याच्या थंडीमुळे त्रिवेणी संगम येथे डुबकी घेण्यास संकोच वाटत होता. पण, धैर्य एकवटल्यानंतर, तिने डुबकी घेतली आणि तिला बरे वाटले. बिनिका हिने सांगितले की, “आम्ही येथे पहाटे ४ वाजता पोहोचलो. त्यानंतर आमच्या संपूर्ण कुटुंबाने एकत्र पवित्र स्नान केले. त्यावेळी खूप छान वाटले. सुरुवातीला आम्हाला वाटले की थंडी असल्याने आम्हाला स्नान करणे शक्य होणार नाही. पण पाण्यात गेल्यावर बरे वाटले. जेव्हा आम्ही देवासाठी काही करतो, तेव्हा ते फार कठीण असे वाटत नाही.”
चंदीगडमधून महाकुंभसाठी आलेला सुमित कुमार याने पवित्र स्नानानंतर म्हटले की, “पवित्र स्नान केल्यानंतर खूप छान वाटले. शांत वाटले. सर्व काही ठीक झाले. स्नान केल्यानंतर आम्हाला आनंद झाला.” हिमाचलमधून आलेल्या शगुन हिनेही स्नान केल्यावर म्हटले की, डुबकी मारल्यानंतर आराम वाटला. पुढे ती म्हणाली की, महाकुंभ मेळा हा आता एका राज्यापुरता मर्यादित कार्यक्रम राहिलेला नसून संपूर्ण भारतातून लोक यात भाग घेण्यासाठी येत आहेत. खूप बरं वाटलं. निवांत वाटलं. विविध राज्यांतून लोक इथे येऊन पवित्र स्नान करत आहेत. लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आमच्या पिढीसाठी हे खूप चांगले आहे,” अशा भावना हिमाचल प्रदेशातील शगुन हिने व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा..
‘मुडा’ जमीन घोटाळा प्रकरणाचा अहवाल लोकायुक्तांकडून उच्च न्यायालयात सादर
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांची चीनला भेट
नालासोपारामधून बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या सात महिलांसह नऊ बांगलादेशींना अटक
त्रिवेणी संगमावर दहा लाखांहून अधिक कल्पवासी उपस्थित आहेत. हे कल्पवासी कठोर आहाराचे पालन करतात आणि दिवसातून एकदाच अन्न घेतात. येथे भाविक गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी येतात. महाकुंभ मेळाव्यामध्ये यंदा ४५ कोटींहून अधिक भाविक भेट देतील, अशी अपेक्षा उत्तर प्रदेश सरकारने व्यक्त केली आहे.