31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरविशेषग्रंथालयांचा विकास समाज आणि संस्कृतीशी निगडित

ग्रंथालयांचा विकास समाज आणि संस्कृतीशी निगडित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत ग्रंथालय महोत्सवाचे उद्घाटन

Google News Follow

Related

ग्रंथालयांचा विकास हा समाज आणि संस्कृतीच्या विकासाशी निगडित आहे. सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रगतीचेही ते मापदंड आहेत. यासाठी ग्रंथालयांचे आधुनिकिकरण आणि डिजिटलायशनला गती देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ग्रंथालय महोत्सव २०२३ च्या उद्घाटनाप्रसंगी केले.

ग्रंथालये हस्तलिखितांचे जतन करतात तसेच इतिहास आणि भविष्यातील दरी ही सांधतात. ग्रंथालयांच्या विकासाला प्राधान्य देऊन ग्रंथालये हा विकासाप्रती मानवकेंद्री दृष्टिकोनाचा अत्यावश्यक भाग म्हणून तसेच ग्रंथालयांच्या विकासाला आणि डिजिटलायझेशनला गती देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ‘ग्रंथालय महोत्सव २०२३’ चे दोन दिवसीय आयोजन केले आहे.

राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या की, ग्रंथालये ही सामाजिक संवादाची, अभ्यासाची आणि चिंतनाची केंद्रे बनली पाहिजेत. ग्रंथालये एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या सामूहिक चेतनेचे आणि बुद्धीचे प्रतीक मानले गेले आहेत. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात अनेक देशांतील लोकांनी भारतातून पुस्तके नेऊन त्यातून ज्ञान मिळवले. पुस्तके आणि ग्रंथालये हा मानवतेचा समान वारसा आहेत. एका छोट्या पुस्तकात जगाच्या इतिहासाची दिशा बदलण्याची क्षमता आहे. महात्मा गांधीजींच्या आत्मचरित्राचा संदर्भ देत त्यांनी सांगितले, की जॉन रस्किन यांच्या ‘अन टू द लास्ट’ या पुस्तकाचा गांधीजींच्या जीवनावर मोठा सकारात्मक प्रभाव पडला आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामधून वर्षभरात १०० कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप

अतिक अहमद टोळीचा सदस्य इरफान हसन पोलिसांच्या ताब्यात

…जेव्हा पंतप्रधान मोदींची धाकटी बहीण मुख्यमंत्री योगींच्या मोठ्या बहिणीला भेटते!

भारतीय नौदलाकडून दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन

दिल्लीमधील प्रगती मैदान येथे हॉल क्रमांक ५ येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ‘ग्रंथालय महोत्सव २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. कायदा आणि न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल, केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या डॉ. अनामिका उपस्थित होत्या. तसेच सर्व राज्यांचे शासकीय ग्रंथालय प्रतिनिधींसमवेत महाराष्ट्र शासनाचे ग्रंथालय संचालक डॉ. दत्तात्रय क्षीरसागर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा